महेश युवा संघटनने साजरा केला गणेशोत्सव व भादवा महोत्सव

0
596
Google search engine
Google search engine

विविध कोरोना योद्धांचा सत्कार

अकोटःसंतोष विणके

तालुका महेश युवा संघटनद्वारा गणेशोत्सव व भादवा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भादवा महोत्सव संपूर्ण राजस्थानी समाजातील आराध्य श्री रामदेव बाबा जन्मोत्सवाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. अकोला रोड येथील चमत्कारी श्री शिव रामदेवबाबा मंदिराच्या प्राचीन मंदिरात बाबा रामदेवजींच्या भादवा महोत्सवाची आणि समाजाच्या युवा शक्तीला संघटीत करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.हा उत्सव ऑनलाइन स्वरुपात साजरा करण्यात आला.गर्दी टाळण्यासाठी उत्सवात ऑनलाइन पूजापाठ व आरती, ऑनलाइन चित्रकला स्पर्धा, मखर (मंडप सजावट) असे विविध कार्यक्रम पार पडले.तसेच कोरोना काळामध्ये माहेश्वरी समाज बांधवांद्वारा देण्यात आलेल्या आपात्कालीन कार्या करीता त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.अकोट तालुक्यात अहोरात्र आपातकालीन सेवा देणारे पोलीस महसूल पालिका व आरोग्य प्रशासनाचे सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वतीने प्रातिनिधिक सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रम सुरळीत व नियोजित पद्धतीने यशस्वी करण्यासाठी तालुका महेश युवा संघटनेचे अध्यक्ष नितेश नथमलजी राठी यांच्या नेतृत्वात प्रकल्प प्रमुख कृष्णा मालाणी व सर्व युवा सदस्य , सल्लागार सदस्य श्री रामदेव बाबा भक्त मंडळाच्या सर्व सदस्य यांचे योग्य सहकार्य लाभले.कोरोना महामारी व शासनाद्वारे देण्यात आलेले निर्देश लक्षात घेता स्थानिक खुदावंतपूर नदी घाटावर गणेशजींच्या मूर्ती चे विसर्जन करण्यात आले.