पोपटखेड जवळ नदीच्या डोहात बुडुन युवकाचा मृत्यू… ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी पाण्यात उतरुन शोधुन काढला मृत्यूदेह..

2454

आकोटःता. प्रतीनिधी

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पोपटखेड खटकाली मार्गावरील नदीपात्रातील डोहात बुडून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला मृतक हा राम झापर्डे(२२)रा.आसेगाव बाजारअसल्याचे कळत आहे.

घटनास्थळ हे चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने चिखलदरा पोलीसांना घटनास्थळी पोहचायला खुप ऊशीर होणार होता. व संध्याकाळ झाल्यास शोध मोहीम राबवतांना अडथळे येण्याची शक्यता पाहता आकोट ग्रामिण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी स्वता डोहात ऊडी मारली व खोल पाण्यात मृतदेहाचा शोध घेत एक तास पाण्यात राहुन मृतदेह शोधुन बाहेर काढला

.दरम्यान घटनास्थळी अकोटचे तहसीलदार हरीश गुरव यांनी तात्काळ धाव घेतली.चिखलदरा पोलिसांची वाट न पाहता स्वतः डोहात उडी मारून मृतदेह शोधून काढणाऱ्या ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या कार्यकर्तृत्वाला अनेकांनी दाद दिली.

जाहिरात