आधार नोंदणीसाठी ‘ऑनलाईन अपॉइंटमेंट सिस्टिम’ – जिल्हाधिकारी शैलेश नवाल

0
1179
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 23 :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी आधार नोंदणी किंवा अद्ययावतीकरणाची कामे आता ‘ऑनलाईन अपॉइंटमेंट सिस्टिम’ या कार्यप्रणालीद्वारे करता येतील. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे अनिवार्य असून, आधार केंद्रांवर गर्दी टाळण्यासाठी ही कार्यप्रणाली शासनाने अंमलात आणली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन आधारचे ॲप (mAadhar – App) डाऊनलोड करून ऑनलाईन अपॉइंटमेंट घेता येईल किंवा http://ask.uidai.gov.in या संकेतस्थळावर माहिती मिळू शकेल.

ही सेवा विनामूल्य असून, त्यासाठी शुल्क नाही, मात्र आधार नोंदणी किंवा अद्ययावतीकरणासाठी जे शुल्क आधार प्रमाणीकरण प्राधिकरणाकडून निश्चित करण्यात आले आहे, ते आकारले जाईल. आधार केंद्रचालकाकडून दरपत्रकात नमूद शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारले जात असेल, तर जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.