कोरोना आजारावर यशस्वीपणे मात केलेल्या योध्यांची यादी जाहीर करा..! माणुसकी बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्राविण्य देशमुख यांची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
592
Google search engine
Google search engine
कोरोना आजाराशी लढणाऱ्या रुग्णांना प्लाझ्मा साठी सहज उपलब्ध होईल नावे
चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
कोरोना आजारावर यशस्वीपणे मात केलेल्या योध्यांची यादी जाहीर करा अशी मागणी चांदूर रेल्वे येथील माणुसकी बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्राविण्य देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे. यामुळे कोरोना आजाराशी लढणाऱ्या रुग्णांना प्लाझ्मा सहज नावे उपलब्ध होईल असे म्हटलेे आहे.
कोरोना या आजारावर महाराष्ट्र राज्यात प्लाझ्मा थेरपी द्वारे उपचार करण्यात येत असुन ही उपचार पद्धती कोरोना आजार बरा होण्यासाठी अत्यंत प्रभावी असल्याचे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांचे मत आहे. कोरोना झालेल्या रुग्णाला जास्त गंभीर  होण्या अगोदर प्लाझ्मा थेरपी सुरू केल्यास अशा रुग्णांना कोरोनावर मात करणे शक्य होते.
     कोरोना रुग्णाला वेळेवर प्लाझ्मा मिळाल्यास अशा रुग्णांचे अवयव निकामी होण्याचा तसेच मृत्यू होण्याचा धोका टाळण्यास मदत होते. त्यामुळेच कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा हा कोरोना रुग्णासाठी नवसंजीवनीच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्लाझ्मा दान करणे हे रक्तदान करण्यासारखेच सुरक्षित असून त्याचा दात्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही.  त्यामुळे अधिकाधिक प्लाझ्मा दात्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे. परंतु दुर्देवाने असा प्लाझ्मा मिळविण्यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणी येत आहेत. कारण शासनाच्या धोरणा नुसार कोरोना रुग्णांचे व बऱ्या झालेल्या व्यक्तीची नाव गुप्त ठेवण्यात येतात. ज्यांचा कोरोना पूर्णपणे बरा झालेला आहे त्यांचे नाव गुप्त ठेवण्याचे काहीही कारण नसून अशा व्यक्तींची नावे, मोबाईल क्रमांक शासनाने जाहीर करावीत जेणेकरून ज्यांना प्लाझ्मा हवा आहे अशा कोरोनाग्रस्त व्यक्तींचे नातेवाईक तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते प्लाझ्मा दानासाठी या प्लाझ्मा दात्यांना विनंती करू शकतील, प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतील.
त्यामुळेच एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता केंद्र शासन व राज्य शासनाने कोरोनावर मात केलेल्या कोरोना योध्यांची नावे जाहीर करावीत अशा आशयाचे निवेदन सामजिक कार्यकर्ते तथा माणुसकी बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्राविण्य देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.