विना मास्क सवारी ऑटो चालकांवर शहर वाहतूक शाखेची दंडात्मक कारवाई,

0
857
Google search engine
Google search engine

नो मास्क नो सवारी मोहीमेची गृहमंत्र्यांद्वारा दखल

200 ऑटो चालकांवर दंडात्मक कारवाई

अकोलाःप्रतिनिधी

विना मास्क सवारी ऑटो चालकांवर शहर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई करत नियम न पाळणार्‍या २०० ऑटो चालकांवर दंडात्मक कारवाई केली,अकोला पोलीस अधीक्षक जी.श्रीधर ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी अकोला शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शासनाची माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी “नो मास्क नो सवारी” ही मोहीम सुरू केली आहे.

या अंतर्गत ऑटो चालकांची स्ट्रीट मीटिंग घेऊन त्यांना करोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वतः मास्क घालण्याचे व ऑटोतुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा मास्क घालण्याचा आग्रह करून मास्क न घालणाऱ्या सवारी साठी ऑटो उपलब्ध न करून देण्याचे आवाहन करुन निर्देश देण्यात आले होते,तसेच याबाबत अॉटोवर जनजागृती पोस्टर्स ही लावण्यात आलेत

आजपासुन पोलीस निरीक्षक गजानन शेळके आपल्या कर्मचार्यांसह रस्त्यावर उतरून नो मास्क नो सवारी चे निर्देश न पाळणाऱ्या ऑटो चालकांवर धडक कारवाया सुरू केल्यात.

एकाच वेळी गांधी चौक, कोतवाली चौक, टॉवर चौक, धिंग्रा चौक ह्या गजबजलेल्या चौकात वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू करताच ऑटो चालकांची तारांबळ उडाली, ऑटो चालक स्वतः मास्क घालून ऑटोत बसलेल्या प्रवाश्यांना सुद्धा मास्क घालण्याचा आग्रह करतांना दिसत होते तरी सुद्धा दिवसभरात तब्बल 200 चे वर मास्क न घालणाऱ्या किंवा मास्क शिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली,ही कारवाई दररोज सुरू राहणार असल्याने ऑटो चालकांनी स्वतः हुन नो मास्क नो सवारी ह्या मोहिमेत सामील होऊन करोना पासून बचाव करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले आहे।