सोनु चौक जवळील मुत्री घर बाधंकाम रद्द करण्याबाबत निवेदन 

0
644
Google search engine
Google search engine

आकोटःशहरातील सोनू चौक येथील मरिमाता मंदिर परिसरात प्रस्तावित मुत्रीघर बांधकाम रद्द करण्याबाबत अकोट तहसीलदार, शहर पोलीस निरीक्षक तसेच नगरपालिका कार्यालय अकोट यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदन कर्त्यांच्या मागणीनुसार शहरातील सोनु चौक भागात मंदिरापासुन काही फुटावर मुत्रीघर प्रस्तावित आहे .या मुत्रीघराचे आऊटलेट नालीमुळं परीसरात मोठ्या प्रमाणात दुर्गधी पसरू शकण्याची भिती आहे व भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.आशा आशयाचे निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेना गटनेते नगरसेवक मनीष रामाभाऊ कराळे,विश्व हिंदू परिषद जिल्हा कार्यकारणी सदस्य गजानन माकोडे,प्रकाश मंगवानी,पप्पू कैसर,परमानंद डोडवाणी,नरेश पारवाणी,सुनील गुप्ता,गोपाल काळे,जगदीश दातीर,विजय पळघाण,प्रवीण बोर्डे,सागर कराळे,बंडू चव्हाण,शिवा टेमझरे इत्यादी सह शिवसैनिक,विश्व हिंदू परिषद,बजरंग दल चे कार्यकर्ते उपस्थित होते.असे निवेदन कर्त्यांनी कळवले आहे.