वरुड मोर्शी तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याकरिता आमदार देवेंद्र भुयार यांचा पुढाकार !

1317
जाहिरात

वरुड मोर्शी तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याकरिता आमदार देवेंद्र भुयार यांचा पुढाकार !

माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न !

वरुड तालुका प्रतिनिधी :
मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार, माजी कृषी मंत्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे अध्यक्षतेखाली मोर्शी विधानसभा मतदार संघातील मोर्शी व वरुड तालुक्यातील अपुर्ण सिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेणे, बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पुर्ण पाणी देवून सिंचनाची सोय उपलब्ध करणे, संत्रा पिकाची लागवड मोठया प्रमाणावर असल्यामुळे प्रकल्पावर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीची कामे व सिंचन क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढ करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत बैठक घेण्यात आली .
अप्पर वर्धा प्रकल्पामधून सोफिया करिता आरक्षित केलेल्या पाण्याचे आरक्षण रद्द करून पाणी वापर संस्था निर्माण करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सिंचन प्रकल्पावर विद्युत निर्मिती प्रकल्प तयार करण्याबाबत सूचना करण्यात आल्या पर्यटनाला चालना देण्याकरिता पाट बंधारे विभागाच्या जमिनीवर पर्यटन केंद्र निर्माण करणे, ग्रामीण पाणी पुरवठा व पाणी वापर संस्थेला आरक्षण वाढवून देने, वरुड मोर्शी तालुक्यातील शेकदारी प्रकल्प तसेच इतर प्रकल्पातून बंदिस्त पाईप लाईनचे पुनरसर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अमरावती जिल्हयामध्ये जलसंपदा विभाग व जलसंपदा विभाग विशेष प्रकल्प अंतर्गत वरुड व मोशी या तालुक्यांमध्ये १ मोठा, १ मध्यम व १९ लघु प्रकल्प आहेत. यापैकी १४ लघु प्रकल्प पुर्ण झालेले असून १ मोठा, १ गध्यम व ५ लघु प्रकल्प बांधकामाधीन आहेत.
वरुड मोर्शी तालुक्यांमध्ये एकुण सिंचन क्षमता २४७१३ हे. इतकी असुन यापैकी १६६०५ हे. क्षेत्रावर बंद नलिकाद्वारे वितरण प्रणाली प्रस्तावित आहे. या तालुक्यात एकुण ११६४१ हे. सिंचन क्षमता निर्मित झालेली आहे व १३०७२ हेक्टर क्षेत्र निर्मित करावयाची आहे. उर्ध्व वर्धा मोठा प्रकल्प, पंढरी मध्यम प्रकल्प तसेच चांदस वाठोडा, पाक, नागठाणा-२, पवनी (संग्राहक), बहादा (संग्राहक), भिमडी, झटामझरी , घोडदेव सिंचन प्रकल्प निम्न चारगड लघु प्रकल्प हे अनुशेषांतर्गत बांधकामाधीन प्रकल्प आहेत. अमरावती जिल्हयातील मोर्शी वरुड तालुका संत्रा फळ बागासाठी प्रसिध्द असून तेथिल भूजल पातळी अत्यंत खलावलेली असल्याने सदर प्रकल्प पुर्ण करुन त्या भागास जलसंजीवनी प्राप्त होण्याच्या दृष्टीने आवश्यक निधी प्राप्त व्हावा अशी मागणी माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख, मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना केली आहे.
पाक नदी लघुप्रकल्प बांधकामाधीन प्रकल्प आहे. प्रकल्पाचा उपयुक्त पाणीसाठा १०.६० दलघमी इतका असून प्रकल्पीय सिंचन क्षमता १४०५ हे. इतकी आहे. प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता निर्माण झालेली आहे. व प्रकल्पाचे मुख्य कालव्यावरून बंद नलिकेव्दारे संपुर्ण लाभक्षेत्रात पाणी वितरीत करण्याचे नियोजित आहे. प्रकल्पाची अदयावत किमंत रु. १२४.८८ कोटी इतकी असून प्रकल्पावर झालेला खर्च रु. ९०.३७ कोटी आहे. सन २०१९-२० करीता रु.१५.०० कोटी इतकी तरतूद करण्याची मागणी केली असून प्रकल्पाचे काम जून २०२१ पर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले प्रकल्प पूर्ण करण्याकरीता रु.२९.१९ कोटीअतिरिक्त निधीची मागणी केली, बोंडना गावाचे नागरी सुविधा दुरुस्तीचे कामास मान्यता देण्याची मागणी करून बोडणा गावठाणातील प्रकल्पबाधित ग्रामस्थांची नविन भुसंपादन कायदयाप्रमाणे मोबदला देण्याची मागणी करून खोपडा गावाच्यानागरी सुविधांची कामे लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या सूचना या बैठकीमध्ये देण्यात आल्या यावेळी मोर्शी वरुड तालुक्यातील सर्वच सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याकरिता सकारात्मक चर्चा करण्यात आली या बैठकीला माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आमदार देवेंद्र भुयार , आमदार रोहित पवार यांच्याह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते .