अकोटमध्ये बजरंग दलाचे ढोल वाजवा सरकार जागवा आंदोलन..!

0
402
Google search engine
Google search engine

अकोटमध्ये बजरंग दलाचे ढोल वाजवा सरकार जागवा आंदोलन..!

अकोट:प्रतिनिधी

करोणा माहामारी आपदेमुळे महाराष्ट्रातील मठ मंदिरे बंद करण्यात आली असून अद्यापही महाराष्ट्र सरकारने मंदिरे सुरू करण्याबाबत कुठलाच निर्णय घेतला नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी यांच्यावतीने ढोल वाजवा महाराष्ट्र सरकार जागवा आंदोलन छेडण्यात आले यामध्ये प्रत्येक शहरातील महानगरातील मंदिरासमोर ढोल वाजवून महाआघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच लवकरात लवकर मंदिराचे दरवाजे ऊघडण्याची मागणी करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे गजानन माकोडे सजंय शर्मा,अनिल गोडागरे बजरंग दलाचे गोपाल कठाळे सुनील देठे मनोज साखरे सुशिल दुधे शुभम टेमझरे गोपाल बोडखे रघुनाथ ढगे राठोड सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शहर पोलीसानी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.