आमदार देवेन्द्र भुयार यांच्या हस्ते वरुड येथिल कोविड हॉस्पिटल चे उद्घाटन ! 

0
1091
Google search engine
Google search engine
आमदार देवेन्द्र भुयार यांच्या हस्ते वरुड येथिल कोविड हॉस्पिटल चे उद्घाटन !
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर वरुड येथील स्व.विनायकराव गोधने स्मृती आय.एम.ए सभागृह चा अभिनंदनीय उपक्रम !
वरुड तालुका प्रतिनिधी :
       वरुड तालुक्यातील नागरिकांना वरुड येथे उत्तम सेवा मिळावी तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण राहू नये, कोरोनामुक्त ऑरेंजसीटी हा प्रामाणिक उद्देश समोर ठेऊन रुग्णांशी वर्षानुवर्षे असणारे ऋणानुबंध कायम राहावे या उदात्त हेतूने प्रेरित होऊन शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करत वरुड तालुक्यात बहुप्रतिक्षेत असलेले सर्व अद्यावत प्रणालीने सुसज्ज अश्या वरुड कोविड हॉस्पिटलचे उदघाटन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात आले .
उदघाटनाप्रसंगी आमदार देवेंद्र भुयार म्हणाले, वरुड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे.  अत्यंत कमी कालावधीत या कोविड रुग्णालयाची उभारणी केली आहे. या रुग्णालयामुळे कोविड रुग्णाला वेळेत उपचार मिळणे सुलभ होणार असून वरुड तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील रुग्णाला या सुविधेमुळे दिलासा मिळणार असल्याचे सांगितले.
वरुड येथील कोविड रुग्णालयाचे उदघाटन आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी विशेष अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळू कोहळे पाटील, तहसीलदार किशोर गावंडे, नगराध्यक्ष  स्वातीताई आंडे, शेघाट नगराध्यक्ष रुपेश मांडवे, जी.प.सदस्य राजेंद्र बहुरूपी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अमोल देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार, पोलिस निरीक्षक पाटील, माजी सभापती राजाभाऊ कुकडे, डॉ राजुरीया, डॉ.राम गोधने,डॉ.मनोहर आंडे,डॉ.रुपाली जैन, डॉ.आशिष लोहे,डॉ.प्रवीण चौधरी, संदीप खडसे, डॉ.विजय देशमुख , डॉ. सुमित जयस्वाल, डॉ. पंकज बिजवे,  डॉ. सुधाकर बंदे , डॉ. मीना बंदे, डॉ कविता देशमुख, डॉ.प्रफुल्ल होले, डॉ.महेंद्र राऊत, डॉ.शीतल राऊत, डॉ. समता चौधरी, डॉ राजेंद्र विटाळकर,मनीष धोटे यांच्यासह आदी प्रामुख्याने उपस्थित होते.