आमदार देवेन्द्र भुयार यांच्या हस्ते चिंचोली गवळी येथे पशु रोग निर्मूलन कार्यक्रमाचा शुभारंभ ! 

0
725
Google search engine
Google search engine
आमदार देवेन्द्र भुयार यांच्या हस्ते चिंचोली गवळी येथे पशु रोग निर्मूलन कार्यक्रमाचा शुभारंभ !
तोंडखुरी, पायखुरी रोगनिर्मूलन करण्याकरिता लसीकरनाला सुरुवात !
पशुपालकांनी पशूंचे लसीकरण तसेच टॅगिंग करण्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आवाहन .
मोर्शी तालुका प्रतिनिधी :
    मोर्शी तालुक्यातील चिंचोली गवळी येथे पशु लसीकरण रोग निर्मूलन कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात आला.
अतिवृष्टीमुळे वातावरणातील ओलावा, सूर्यप्रकाशाचा अभाव, ढगाळ वातावरण गोठ्यातील ओलावा चारापाण्याची ढासळलेली प्रत या एकूणच परिस्थितीमुळे जनावरांच्या शरीर प्रक्रियेवर ताण पडतो. जनावरांमध्ये आजारांचे प्रमाण किंवा साथीचे रोग जसे घटसर्प, फऱ्या इत्यादी उद्‌भवतात.
त्यासाठी पशुपालकांनी जनावरांना योग्यवेळी लस देणे आवश्यक आहे. गाई, म्हशी व शेळ्या मेंढ्या हे पाळीव प्राणी घटसर्प,  फऱ्या व आंत्रविषार यासारख्या विविध साथीच्या रोगांमुळे अनेक जनावरे मरण पावतात.  या सगळ्या परिस्थितीमुळे पशुपालकास फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते या रोगांमुळे शेतकाऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान होऊ नये म्हणून राष्ट्रीय पशु रोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत चिंचोली गवळी येथील पशु वैद्यकीय दवाखाना येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत लसीकरण शिबिर आयोजित करून जनावरांना लस लावून टॅगिंग करण्यात आले.
चिंचोली गवळी येथील निलेश खटोले यांच्या गीर गाईने विविध प्रदर्शनी मधून १५ वेळा विविध बक्षिसे मिळविल्यामुळे निलेश खटोले यांचा सत्कार तसेच तोंडखुरी व पायखुरी रोगनिर्मूलन माहिती पुस्तकाचे विमोचन आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात आले.  रोग निर्मूलन, करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पशुपालकांनी अधिकाधिक पशूंचे लसीकरण तसेच टॅगिंग करण्याचे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.
 यावेळी कार्यक्रमाला आमदार देवेन्द्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार, प.स. सभापती यादवराव चोपडे, माजी सभापती संजयजी सोनटक्के,पोलिस पाटील शुद्धोधनजी जिचकार, डॉ. राधेश्यामजी बहादूरे, डॉ. चंद्रशेखरजी गिरी, डॉ. लोणकर,डॉ.सोनेकर, राजाभाऊ हटकर  लवकेश राऊत, विक्रम राऊत, नरेश एकोतखाने, संदीप काळे,मधू आप्पा बारस्कर, श्रीकृष्ण चौधरी, बाळूभाऊ देशमुख, फारूक भाऊ यांच्यासह आदी अधिकारी पदाधिकारी व चिंचोली गवळी येथील पशुपालक प्रामुख्याने उपस्थित होते.