*हॉटेल्स, खाद्यगृहे, रेस्टॉरंट व बारची वेळ रात्री दहापर्यंत*

0
797
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 9 : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात हॉटेल्स, खाद्यगृहे, रेस्टॉरंट व बार रात्री दहापर्यंत नियमित सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला.

कोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर लागू संचारबंदीत शिथीलता आणल्यानंतर मिशन बिगिन अगेनअंतर्गत जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, खाद्यगृहे, रेस्टॉरंट व बार सुरू करण्यास यापूर्वीच परवानगी देण्यात आली. आता याबाबत पर्यटन संचालनालयाकडून स्वतंत्र मानक कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार हॉटेल्स, रेस्टॉरंट व बार रात्री दहापर्यंत सुरू राहू शकतील.

तथापि, हॉटेल, खाद्यगृहे व बार त्यांच्या आस्थापनेच्या पन्नास टक्के क्षमतेपेक्षा किंवा स्थानिक प्राधिकरणाने निश्चित करून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेने सुरू ठेवता येणार नाहीत. त्याचप्रमाणे, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्स, सॅनिटायझेशन आदी सर्व उपाययोजना करणे हॉटेल व बारचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे.

000