कोंड मुरुड रोडवरचा तो “दगड” कोणाचा जिव घेणार ……!

0
687
Google search engine
Google search engine

कोंड मुरुड रोडवरचा तो “दगड” कोणाचा जिव घेणार ……!

उस्मानाबाद / प्रतिनीधी
उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील मुरुड जाणार्या रोडवर भला मोठा दगड ठेवला आहे त्यामुळे अपघातात जिव जावू शकतो .
याबाबत अधीक माहिती अशी की कोंडहुन मुरुडकडे जाणार्या अर्धा किलोमिटर अंतरावरील पुलावर भला मोठा खड्डा पडून पुलातील नला फुटला आहे.त्यामुळे तो अज्ञात व्यक्तीने त्या खड्यात वहान जाऊन अपघात होऊ नये म्हणून पुलावर मोठा दगड ठेवला आहे.पण अंधारात ये जा करणार्या मोटार सायकल व इतर वहान जर चुकून त्या दगडाला धडकले तर जाग्यावरच म्रत्यू होऊ शकतो. त्यामुळे याकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत असाल्यामुळे हा खड्डा कोण बुजवणार याकडे एकही गावपुढारी लक्ष देत नसल्याची चर्चा गावात चांगलीच रंगू लागली आहे.