संभाजी ब्रिगेड ची चांदुर बाजार तालुक्याची कार्यकारणी घोषित.

0
273
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार येथे १६/११/२०२० सोमवारी संभाजी ब्रिगेड तालुका कार्यकारणी बैठक आयोजित करत तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली, बैठकीला समस्थ तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक तूषार उमाळे व जिल्हाध्यक्ष शुभम शेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदुर बाजार संभाजी ब्रिगेडची तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली याच बरोबर तालुक्यात गाव तिथे शाखा हे अभियान राबविण्यात येणार असून तालुक्यातील विद्यार्थी, शेतकरी व कामगारांचे प्रश्न सोडवण्याकरता संभाजी ब्रिगेड #आक्रमकतेने लढा देणार असल्याचे प्रदेश संघटक तुषार उमाळे यांनी सांगितले बैठकीला व्हीं.बी.व्ही.पी राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.तुषार देशमुख,संभाजी ब्रिगेडचे ज्येष्ठ नेते शरद कडू उपस्थित होते यावेळी संभाजी ब्रिगेड चांदुर बाजार तालुका अध्यक्ष पदी प्रतीक काटोलकर, उपाध्यक्ष संतोष किटूकले, चांदुर बाजार शहर अध्यक्ष अक्षय पांडे, संघटक विशाल इंगोले, अक्षय उल्ह्रे, विक्की अटलकर व अन्य नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यावेळी बैठकीचे सूत्रसंचालन रीद्धेश ठाकरे तर प्रस्ताविक मिलिंद ढेवले यांनी केले.