कडेगावात आज फुटणार ऊसदराची कोंडी* ;  *कारखान्यांचे अध्यक्ष  आणि स्वाभिमानीची  दुसरी बैठक : एकरकमी एफआरपी अधिक दोनशेची अपेक्षा*

0
326
Google search engine
Google search engine

*
सांगली /कडेगाव :
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखान्यांचे अध्यक्ष यांच्यात आज 
कडेगाव येथे  ऊस दर प्रश्नी होणाऱ्या  
दुसऱ्या बैठकीकडे जिल्ह्यातील  ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे
लक्ष लागले आहे.               यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांनी प्रतिटन उसाला एकरकमी  एफआरपी आणि गळीत हंगं संपल्यानंतर 
अधिक २०० असा  दर द्यावा अशी मागणी शुक्रवारी झालेल्या पहिल्या बैठकीत केली होती.
यावेळी बहुतांशी कारखान्यांचे अध्यक्ष 
उपस्थित नसल्याने निर्णय झाला नाही . यामुळे आज  बुधवारी दुपारी कडेगाव 
येथे  स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची दुसरी  बैठक़ होणार आहे. आजच्या बैठकीत उसदाराची कोंडी फुटली नाही तर  कारखान्यापर्यंत ऊस जाऊ देणार नाही .
एफ आर पीचे तुकडे करून देण्यासाठी साह्य घेणाऱ्या कारखानदारांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिसाद देऊ नये .आज तोडगा निघाला नाही तर उद्रेक 
अटळ आहे.असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे .
चौकट : 
*मोहनराव कदम यांचा पुढाकार* :
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचागळीत हंगाम कोणत्याही अडचणीशिवाय सुरू राहावा यासाठी  स्वाभिमानी  आणि  कारखानदारांची बैठक घेवून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत . सोनहीरा कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव  कदम यांनी पुढाकार घेऊन बैठकीचे आयोजन
केले आहे .या प्रयत्नांना जिल्ह्यातील  साखर कारखानदार कितपत प्रतिसाद देतात याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आहे .