लाकडाऊन झाले अन् शाळेला सुट्टी मघ निवडला हा व्यवसाय !

0
2244
Google search engine
Google search engine

लाकडाऊन झाले अन् शाळेला सुट्टी मघ निवडला हा व्यवसाय !

उस्मानाबाद / प्रतिनीधी
कोरोनाच्या महारामारीत शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थी घरात बसुन विवीध व्यवसाय करण्यासाठी पर्याय निवडत आहेत.अर्थीक संकटावर मात करण्यासाठी असाच एक व्यवसाय उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील बहिण भावंडानी मिळून एक घरबसल्या छोटा व्यवसाय निवडला आहे.
याबाबत अधीक माहिती अशी कि कळंब तालुक्यातील मंगरुळ पाटी येथे वैशाली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत “नवजिवन” गोशाळा चालवली जात आहे यात ५० जणावरे आहेत. हे जणावरे कत्तलखान्यात जात असताना पोलीसांनी पकडून या गोशाळेला दिले आहेत.यात परिसरातील भाकड जणावरे शेतकर्यांनी दिलेली आहेत.सध्या कोरोनाच संकट भयानक आणि त्याततच येवढी जणावरे सांभाळणे मोठे कसरतीचे ठरले. परस्थीतीवर मात करण्यासाठी व या गोशाळेतील जणावरे जोपासण्यासाठी संस्थेच्या तरुण संस्थेच्या सचिव व सेक्रेटरी ऋषीकेश व त्याची छोटी बहीण ऋचिता (हा मुलगा हा इंजीनीअरींग 3 रे बर्ष व मुलगी b b a च्या 1 ल्या बर्षात पुण्यात शिकत आहेत ) यांनी दोघांनी मिळून गोशाळेतील गायींच्या गोमुत्राचे अर्क ,व शेणापासून धुप ,पणत्या ,जळणारे दिवे, गोवर्या , साबण,आम्रतधारा,तुलशी आर्क व इतर नँचरल औषधी गुणधर्म असणार्या वस्तू बनवून छोटा व्यवसाय सुरू केला आहे.त्यामुळे गोशाळेत असणार्या जणावरांना जगवण्याचे काम हे बहिणभावांनी केले आहे.मात्र सध्या या जणावरांना जगवण्यासाठी चारा व पाणी दररोज २ हजार रुपये खर्च होत आहे.त्यासाठी याना मदतीचा हात देण्यासाठी परिसरातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची आवश्यकता आहे.

(फोटो ओळ – संस्थापकअध्यक्ष व मुले)