माहे मे आणि जून महिन्यातील नुकसान ची भरपाई द्या शिवसेना आणि युवासेनेचे तहसीलदार यांना निवेदन

190
माहे मे आणि जून महिन्यातील नुकसान ची भरपाई द्या
शिवसेना आणि युवासेनेचे तहसीलदार यांना निवेदन
चांदुर बाजार :-
                         चांदुर बाजार तालुक्यात मे आणि जून महिण्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शिरजगाव कसबा महसूल मंडळ मधील शेतकरी यांचे संत्रा फळबाग चे मोठे नुकसान झाले होते,त्याबाबत तलाठी यांनी सर्वे देखील केला.जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी तालुक्यात शेतकरी याना मदत मिळाली  मात्र चांदुर बाजार तालुक्यातील शेतकरी याना त्याचा लाभ मिळाला नाही.
           तसेच नोव्हेंबर 2020 मध्ये पिपरी चे देखील रोगामुळे मोठे नुकसान झाले यांचे पंचनामे करून शेतकरी याना तात्काळ मदत करावी यासाठी युवसेने कडून चांदुर बाजार तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी युवासेना तालुका अध्यक्ष शैलेश पांडे, शुभम सपाटे, चंदन पवार (युवासेना उपतालुका प्रमुख,), दर्शन बदूकले (शाखाप्रमुख), शुभम श्रीराव, वैभव श्रीराव, महेंद्र परिसे उपस्थित होते.