वाढत्या कोरोना मुळे जिल्ह्यातील यात्रा महोत्सव रद्द प्रसिध्द बहिरम यात्रा भरणार नाही,गर्दी न करण्याचे प्रशासन चे आव्हान

0
873
Google search engine
Google search engine

वाढत्या कोरोना मुळे जिल्ह्यातील यात्रा महोत्सव रद्द

प्रसिध्द बहिरम यात्रा भरणार नाही,गर्दी न करण्याचे प्रशासन चे आव्हान

 

चांदुर बाजार :-

देशा बरोबर अमरावती जिल्ह्यात कोरोना वाढतच आहे.प्रशासन कडून वेळोवेळी खबरदारी घेतली जात असताना अमरावती जिल्ह्यातील यात्रा एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच एक व्यतिपासून दुसऱ्या व्यक्ती पर्यत विषाणू पसरू नये याकरिता अमरावती जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील यात्रा रद्द केल्याचे जिल्हा परिषद मुख्यधिकारी अमोल येडगे यांनी पत्राद्वारे सूचित केले असून यामध्ये विदर्भातील सर्वात दीर्घकळ चालणारी बहिरम यात्रा देखील रद्द करण्यात आली आहे.

मंदिर उघडे असून पूजा ,करण्याची परवानगी असली तरी कोरोना बाबत नियमावली चे पालन सर्वांनी करायचे असल्याचे प्रशासन कडून सांगण्यात आले आहे.तसेच ग्रामीण भागातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक यात्रा,उत्सव, समारंभ,सभा,बैठक,रॅली घेणे वर बंधन आहे.त्यामुळे नागरिक यांनी प्रशासन याना सहकार्य करून कोरोना पासून आपला आणि इतरांच्या संरक्षण करण्याचे आवाहन प्रशासन यांनी केली आहे.

प्रतिक्रिया:-

जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार तालुक्यातील बहिरम यात्रा रद्द करण्यात आली आहे.तरी नागरिक यांनी सहकार्य करावे. ग्रामपंचायत हद्दीत यात्रा महोत्सव, बैठक,मिरवणूक ला देखील बंदी आहे.याबाबत ग्रामपंचायत सचिव आणि प्रशासक याना माहिती देण्यात आली आहे.

डॉ प्रफुल्ल भोरखडे उच्च श्रेणी गटविकास अधिकारी चांदुर बाजार

बॉक्समध्ये:-

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील बहिरम,भातकुली तालुक्यातील ऋणमोचन, तिवसा तालुक्यातील कौढण्यापूर, जहागिरपूर,मोर्शी पंचायत समिती हद्दीतील सालबर्डी,चांदुर रेल्वे पंचायत समिती हद्दीतील सावंगा विठोबा,भिलटेक,घुइखेड या यात्रा रद्द करण्यात आल्या आहे.