कार्यलायात येताना सायकलने या :- अमोल येडगे मुख्यधिकारी अमरावती

0
563
Google search engine
Google search engine

कार्यलायात येताना सायकलने या :- अमोल येडगे मुख्यधिकारी
सोमवार आणि शुक्रवारी सायकलने येणे बंधनकारक, अन्यथा दंड

चांदुर बाजार:-

          अमरावती जिल्हा परिषद चे मुख्य धिकारी अमोल येडगे यांनी आपल्या सर्व कर्मचारी यांनी दर सोमवारी आणि शुक्रवारी सायकल ने कार्यलायात येण्याचे आदेश दिले असून त्याबाबत त्यांनी पत्र देखील काढले आहे.जे कर्मचारी यांची उलघन करणार त्यांच्या वर दंडाची देखील तरतूद केली असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. <span;>कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचा दावाही या परिपत्रकात करण्यात आला आहे. आहे.

अमरावती जिल्हा परिषद चे मुख्यधिकारी अमोल येडगे  यांनी हे परिपत्रक काढलं आहे. 27 नोव्हेंबर 2020  रोजी हे परिपत्रक जारी करण्यात आलं असून सोमवारी सुट्टी येत असल्याने 4 डिसेंबर पासून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.