मोर्शी येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन ! 

0
1193
Google search engine
Google search engine
मोर्शी येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन !
आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना अटक !
आंदोलनाला आले पोलीस छावणीचे स्वरूप !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :
          शेतकरी विरोधी कायदे रद्द करून शेतकरी बांधवांना न्याय द्यावा या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष समिती व  सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने आज दि 8 डिसेंबर रोजी स्थानिक जयस्तंभ चौक येथे मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने काही काळ अमरावती व वरूड मार्गाने होणारी वाहतूक ठप्प झाली त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दिल्ली सीमेवर चालू असलेल्या शेतकरी मोर्चास पाठिंबा म्हणून हे आंदोलन पुकारण्यात आले होते.
          केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कायदे केलेले असून सदर तिन्ही कायदे शेतकरी विरोधी असल्याने देशातील सर्व राज्यात या कायद्यांना विरोध होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे व सर्व आंदोलनाला शेतकरी फार मोठा प्रतिसाद देत आहे. यावरून दिसून येते कि, सदर कायदे शेतक-यांना मान्य नाही, करिता शेतकरी विरोधी तिन्ही काळे कायदे रद्द करून शेतक-यांना न्याय देण्यात यावा, “केंद्रातील भाजप सरकार दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन बळाच्या जोरावर दडपून टाकून पाहत आहे. शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून, अश्रूधूर सोडून, हायवेवर खड्डे खणून, शेतकरी नेत्यांना स्थानाबद्ध करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. गेले 10 दिवसापासून लाखो शेतकरी केंद्र सरकारच्या या दडपशाहीला न जुमानता दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन बसले आहेत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन सर्व राज्यांमध्ये आणखी तीव्र करण्यात येत आहे.
        शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचे रास्त संरक्षण द्या, केंद्र सरकारने केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, या प्रमुख मागण्या शेतकरी संघर्ष समिती व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले रास्ता रोको आंदोलन दरम्यान मोदी तेरी तानाशाही नही चलेगी, नही चलेगी, ” वारे मोदी तेरा खेल स्वस्ति दारु मेहेंगा तेल”  भारत माता की जय. अशा प्रकारच्या घोषणा करण्यात आल्याने  संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.  आज  सकाळपासूनच  मोर्शी शहरातील  सर्व  प्रतिष्ठाने  शाळा कॉलेजेस व सरकारी  निमसरकारी कार्यालय बंद ठेवून व्यापाऱ्यांनी  सुद्धा  या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.  जवळपास एक घंटा सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून मोर्शी चे पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी आमदार देवेंद्र भुयार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसून ताब्यात घेतले . यावेळी आमदार देवेंद्र भुयार , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश अढाऊ,  काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रमेश काळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष रुपेश वाळके, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष हितेश साबळे, नप चे माजी उपाध्यक्ष मोहन मडघे, डॉ प्रदीप कुऱ्हाडे, ख वि स चे उपाध्यक्ष मोरेश्वर गुडधे, नगरसेविका क्रांती चौधरी,  माजी जी प सदस्य बंडू साऊत, शिवसेना माजी उप जिल्हाप्रमुख सुरेशचंद्र विटाळकर,  अतुल उमाळे, सुहास ठाकरे, समीर विघे,  दिनेश मिश्रा , दीपक खोडस्कर,  विनोद सोनटक्के, प्रशांत उमाळे, निलेश लायदे, भूषण कोकाटे, योगेश गणेश्वर, नीतीन पन्नासे, सागर ठाकरे, डॉ गजानन चरपे अमित पठाण, मनोज टेकडे, गाजजन ठवळी, पवन कळमेघ, अतुल खोडास्कर, प्रदीप  इंगळे, वशीम    कुरेशी, गोलू शेख, भूषण राऊत यांच्यासह हजारो सर्वपक्षीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.