बंदला शेगावातील अल्प प्रतिसादाचा संबंध थेट राज्य सरकारशी ?

0
325
Google search engine
Google search engine

शेगावातील अल्प प्रतिसादाचा संबंध थेट राज्य सरकारशी ?
नाराजी राज्य सरकारवर की केंद्र सरकारवर ?

शेगांव (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या ०८ डिसेंबरच्या भारत बंदचा प्रारंभ शेगांव तालुक्यात अत्यल्प प्रतिसादाने झाला.

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसेच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. शेगांव – संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले, या आंदोलनात महाविकास आघाडीसह अखिल भारतीय किसान सभेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव यांचा सहभाग होता. शेगांवात मात्र बाजारपेठ सुरू होती इतर मार्केटमधील दुकाने कुठे बंद, कुठे सुरू अशा प्रकारचा मिश्र बंद दिसून आला मात्र एसटी बसला कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

चक्का जमच्या ठिकाणी सरकार विरोधात घोषणा करत कायद्याच्या निषेधार्थ नारेबाजी करण्यात आले. ह्यावेळी ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला.

शेगांव व वरवट बकाल येथे रास्ता रोको करताना तालुक्यातील शेतकरी बांधवांची, नागरिकांची उपस्थिती मात्र वादात सापडली आहे कारण महाविकास आघाडीच्या सरकारमधील पक्ष्यांनी बंदला पाठिंबा जाहीर केल्यानंतर ही बंदला पक्षातील पदाधिकाऱ्यांचीच उपस्थिती मोजक्या प्रमाणात होती यावरून महाविकास आघाडीचे शेगावात वर्चस्वावर आणि जनसंपर्कवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यात तीन पक्ष्यांनी बनवलेली मजबूत सरकार ? असून ही सरकार आपण शेतकऱ्यांशी थेट संपर्कात असल्याचे दावे नेहमीच करीत आले आहे मात्र शेगावातील शेतकऱ्यांच्या बंदला उपस्थित पदाधिकाऱ्यांची संख्या पाहता तो दावा किती खरा हे पाहणे महत्त्वाचे.