शेघाट येथे आमदार देवेन्द्र भुयार यांच्या नेतृत्वात  चक्काजाम आंदोलन! 

0
648
Google search engine
Google search engine
शेघाट येथे आमदार देवेन्द्र भुयार यांच्या नेतृत्वात  चक्काजाम आंदोलन!
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात शेघाट येथे महाविकास आघाडीचा चक्काजाम आंदोलनाला शेतकरी उतरले रस्त्यावर !
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह आमदार देवेन्द्र भुयार यांना अटक
वरुड तालुकप्रतिनिधी:

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा केल्याच्या निषेधार्थ वरुड तालुक्यामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात   ८ डिसेबरला भारत बंद चे आव्हान करण्यात आले होते.बदला वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला तर ग्रामीण भागात शेघाट आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात करून जवळपास दिडतास चक्काजाम आंदोलन करून वाहतूक व्यवस्था ठप्प करण्यात आली होती.

  शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचे रास्त संरक्षण द्या, केंद्र सरकारने केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, या प्रमुख मागण्या करून रास्ता रोको आंदोलन दरम्यान मोदी तेरी तानाशाही नही चलेगी, नही चलेगी, ” वारे मोदी तेरा खेल स्वस्ति दारु मेहेंगा तेल”  भारत माता की जय. अशा प्रकारच्या घोषणा करण्यात आल्याने  संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.  आज  सकाळपासूनच  वरुड तालुक्यातील सर्व  प्रतिष्ठाने  शाळा कॉलेजेस व सरकारी  निमसरकारी कार्यालय बंद ठेवून व्यापाऱ्यांनी  सुद्धा या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.

               केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कायदे केलेले असून सदर तिन्ही कायदे शेतकरी विरोधी असल्याने देशातील सर्व राज्यांत या कायद्यांना विरोध आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे व सर्व आंदोलनाला शेतकरी फार मोठा प्रतिसाद देत आहे. यावरून दिसून येते कि, सदर कायदे शेतक-यांना मान्य नाही, करिता शेतकरी विरोधी तिन्ही काळे कायदे रद्द करून शेतक-यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली.
          या आंदोलनामध्ये आमदार देवेंद्र भुयार,  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप खडसे, संजय डफरे, शिवसेनेचे शे घाट शहर अध्यक्ष अजय सरोदे, गौरव गणोरकर, नगरसेवक भुपेंद्र कुवारे,कपिल तरार, गुड्डू पठाण, अंकुश मोघे, घनश्याम अकोटकर, सतीश काळे, पवन बेलसरे, नगरसेवक राकेश दवंडे, प्रतीक खेरडे आदित्य भद्रे, लोकेश वंजारी, निलेश पाटील, प्रवीण कुबडे, गजानन थेटे, विक्की जवंजाळ यांच्यासह शेकडो पदाधिकारी व शेतकरी बांधव सहभागी झाले होते.