अकोट दर्यापूर मार्गावर अपघातः युवक ठार

0
1164
Google search engine
Google search engine

अकोट:प्रतिनिधी

अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अकोट दर्यापूर मार्गावरील ढगा फाट्यानजीक दुचाकीच्या अपघातात 34 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. सदर घटना दि १२ रोजी दुपार दरम्यान घडली. मृतक हा सतीश तुळशीराम शेगोकार(३४) राहणार निंबा तालुका मूर्तिजापूर येथील असल्याची माहिती आहे. मृतक हा आकोट येथील सासरवाडी येथुन त्याच्या गावी परत जात असताना त्याचा अपघात झाला. या प्रकरणी विनायक तुळशीराम शेगोकार ह.मु. तेल्हारा यांच्या फिर्यादीवरून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला. पुढील तपास आकोट ग्रामीण पोलिस करीत आहेत