बसमध्ये पर्समधील सोने व पैसे चोरणारी टोळी जेरबंद ठाणेदार अशोक कांबळे यांच्या नेतृत्वात तळेगाव दशासर पोलीसांची विशेष कामगिरी

0
1729
Google search engine
Google search engine

 

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)

तळेगाव दशासर ते देवगाव दरम्यान बसमध्ये पर्समधील सोने व पैसे चोरणारी टोळी अगदी काही तासांतच जेरबंद केल्याची विशेष कामगिरी तळेगाव दशासर पोलीसांनी ठाणेदार अशोक कांबळे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी केली. चालकाने कौशल्याने पोलीस जीप चालविल्याने आरोपींना तत्काळ अटक करणे शक्य झाले आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबर रोजी दुपारी 01.30 वा चे सुमारास फिर्यादी नामे सौ. इंदू नारायणराव मानकर वय 35 वर्ष (अंगणवाडी मदतनिस) रा. कावली ता. धामणगाव जि अमरावती ह्या वर्धा ला जाण्यासाठी तळेगांव दशासर येथून बस मध्ये बसल्या. त्यांचे सोबतच तीन संशयित महिला सुद्धा बस मध्ये बसल्या. सदर 3 महिला महिला देवगावला उतरल्या व गाडी वर्धा कडे निघाली. फिर्यादी महिलेस शंका आल्याने त्यांनी आपली पिशवी चेक केली असता त्या मध्ये ठेवलेली पर्स त्यांना दिसून आली नाही. सदर पर्स मध्ये फिर्यादी महिलेने त्यांची एक सोन्याची पोथ किंमत अंदाजे 65000/- रुपये व नगदी 1000/- रुपये असा एकूण 66000/- रु चा ऐवज ठेवला होता. तो चोरी गेल्याचे त्यांचे निदर्शनास आले असता त्या तेथेच उतरल्या. व पो. स्टे. ला तक्रार देण्यासाठी आल्या. पोलीस कर्मचारी माहिती घेऊन लगेच देवगाव ला तपास कामी रवाना झाले. पोलीसांनी देवगाव स्टँड वरील ऑटो चालक कडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, सदर संशयीत महिला या ऑटो मध्ये बसून बाभूळगाव कडे गेल्या आहेत. या माहिती वरून पोलीस स्टाफ सह बाभूळगाव च्या दिशेने गेले असता सदर महिला ऑटो सोडून बस मध्ये बसून गेल्याचे समजले.
बस थांबवून सदर महिलांना पो. स्टे. ला आणून महिला कर्मचारी ने कसून विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन माल काढून दिला. सदर बाबत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. कार्यवाही मध्ये तळेगावचे ठाणेदार अशोक कांबळे, पो.हे.काँ. महादेव, ना.पो.शी. प्रवीण पाटील, पो.शी. पवन, चालक प्रदीप मस्के यांनी सहभाग घेतला. विशेषतः चालक पो.शी. प्रदीप मस्के यांनी कौशल्याने पोलीस जीप चालवून आरोपींना पाठलाग केला त्यामुळे आरोपी पकडणे शक्य झाले.