महावितरण व नगरपरिषदचे अधिकारी “आमने – सामने”

0
540
Google search engine
Google search engine

म.रा.वि.क.म.चे अधिकारी करणार का ? न. प. अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

शेगांव :- जगभराला २०२० मध्ये कविड-१९ च्या आजाराने ग्रासले, हा आजार सार्वजनिक असल्याकारणाने अनेक देशातल्या राज्यसरकारांनी WHO च्या सूचनांचे पोस्टर्स बॅनर्स च्या माध्यमातून जाहिराती करत, समाज जागृती करण्याचा व अनेकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला तर न. प. मुख्याधिकारी यांच्या आदेशाने काही जाहिरातींचे बॅनर्स शेगांव शहरात ठिकठिकाणी अवैध जागेवर लावण्यात आले आहेत. एकीकडे शासकीय अधिकारी कोविड योद्धा म्हणून लोकांचा जीव वाचवण्यासाठी खटपट करत आहे तर दुसरीकडे मुख्याधिकारी स्वतःच्याच कर्मचारींच्या जीवाशी खेळ खेळत आहे असे दिसते.
नगर परिषदचे मुख्याधिकारीचे आदेशाने सूचनांचे बॅनर हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या हाय टेन्शन तारेच्या विद्युत खांबावर नगर परिषदेने आठवडी बाजाराच्या वर्दळीच्या परिसरात आणि जगदंबा चौक येथे लावले यामुळे नगर परिषद मुख्यधिकाऱ्यांवर म.रा.वि.क.मचे अधिकारी कारवाई करतील का अशी प्रश्नार्थक चर्चा नागरिकांमध्ये होतांना दिसत आहे.
तीन वर्षांपूर्वी शहरातील छ. शिवाजी चौक येथे असेच प्रसिध्दीचे बॅनर लावत असताना एका १७ वर्षीय मुलाचा विद्युत तारेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला पण या घटनेतून मुख्याधिकारी काहीही बोध घेतांना दिसत नाही.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या हाय टेन्शन तारेच्या खांबावर शहरातील बाजार फैल, जगदंबा चौक, रा. जिजाऊ चौक अश्या अनेक चौकांमध्ये विद्युत पोलवर जाहिरातीचे बॅनर लावले आहेत. तर काही जाहिरातींचे बॅनर नगर परिषदेची परवानगी नसलेले आढळून आले तरी यावर न.प. आणि म.रा.वि.क.म. कार्यालय काय कारवाई करेल याकडे सर्व गावाचे लक्ष लागले आहे. कारण आतापर्यंत अधिकारी वर्ग यांनी फक्त सामान्य जनतेवरच कार्यवाही केली आहे परंतु आता एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करेल का की त्याला योग्य कारण शोधून टाळाटाळ होईल शेगाव नगरीत या गोष्टीची मोठ्या जोरात चर्चा होत आहे.