*कोरोनाकाळात कुटुंबनियोजनाच्या १ हजार ७७२ यशस्वी शस्त्रक्रिया – आरोग्य विभागाव्दारे कुटुंब नियोजन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबाजवणी*

0
1202
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 22 : कोरोनाची साथ असतानाही आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका यांनी आरोग्य सेवेलाच प्रथम प्राधान्य देत आपले कर्तव्य चोख बजावले आहे. कोरोना काळातही आरोग्य विभागाने ग्रामीण व शहरी क्षेत्र मिळून 1 हजार 772 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन कुटुंब नियोजन कार्यक्रमाची जिल्ह्यात यशस्वीरित्या अंमलबजावणी केली आहे.

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीच्या काळात सुध्दा शहरी व ग्रामीण भागात घरोघरी जाऊन कुटुंब नियोजन सर्व्हेक्षण केले. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण व प्राथमिक औषधोपचार केला आहे. राष्ट्रीय कार्यक्रम राबवित असताना लाभार्थींचा विश्वास संपादन करुन त्यांना कुटुंब नियोजनाचे फायदे समजावून सांगून त्यासाठी प्रोत्साहित केले.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हा संवेदनशिल विषय आहे. त्याचे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व भावनिक असे दूरगामी परिणाम समाज व्यवस्थेवर होत असतात. त्यामुळे आरोग्य विभागाचा अत्यंत महत्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून गणला जातो.

लोकसंख्येचा विचार करता, आरोग्य विभाग त्यादृष्टीने निरंतर निरनिराळया कुटुंबनियोजन साधनांची माहिती गावातील पात्र लाभार्थी, विवाहीत परंतु शस्त्रक्रिया न झालेले 15 ते 49 वर्षे वयोगटातील लाभार्थीपर्यंत पोहोचवून शस्त्रक्रिया अवलंबिण्याबाबत पात्र जोडप्यांना मार्गदर्शन करतात. त्यामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व कुटुंब नियोजनाची तात्पुरती वापरावयाची साधने यांचा समावेश असतो. यापैकी पुरुष व स्त्री शस्त्रक्रिया लाभार्थींना एक पसंती असते जे पात्र लाभार्थी तात्पुरत्या साधन सामुग्रीचा वापर करण्यास नकार देतात त्यांच्याकरीता कायमची कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा पर्याय दिला जातो. हेच शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आरोग्य विभागाने पुरेपुर प्रयत्न केलेला आहे.

अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुक्यांमध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरे उपजिल्हा रुग्णालये, ग्रामिण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये घेण्यात आली. त्यात जिल्ह्यामध्ये एकूण 1 हजार 772 शस्त्रक्रिया झाल्या. त्यात पुरुष शस्त्रक्रिया 53 व स्त्री शस्त्रक्रिया 1 हजार 719 झाल्या आहेत.

सगळीकडे कोविड 19 ची कामे सांभाळून न थकता अगदी जोमाने आरोग्यविभाग आपले कर्तव्य व कार्य पूर्ण करीत आहेत. प्रत्येक कर्मचारी व अधिकारी आपले उदिष्ठ पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कार्यालयाच्या कुटुंबकल्याण विभागातील प्रशासकिय अधिकारी सुभाष सिडाम, आरोग्य सहायक श्री. कुंभलवार, आरोग्य सेविका प्रिति तसरे हे काम सांभाळत असून उदिष्टपूर्तीकडे वाटचाल करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. सदर शस्त्रक्रिया शिबिरास शल्यचिकित्सक म्हणून डॉ. जैस्वाल, डॉ.नालट, डॉ. मनवर, डॉ. कळसकर, डॉ. रावलानी, डॉ. सालकर, डॉ. कांबळे, डॉ. गोळे, डॉ. गजरलवार, डॉ. धुमाळे, डॉ. पि. चौधरी, डॉ सांगोळे , डॉ. समता चौधरी ही चमू कार्य सांभाळत आहे.

 

*डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. अमरावती यांचे कोट-*

दैनंदिन कार्याचा वाढता ताण व विपरित परिस्थिती, यावर मात करुन माझे वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक ,आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तसेच आशा स्वयंमसेविका काम करीतच आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकसंख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने खारीचा वाटा ऊचलून लार्भार्थिंचे मतपरिवर्तन करने व शस्त्रक्रियेसाठी तयार करणे हा त्यांच्या परिश्रमाचाच एक अविभाज्य घटक आहे आणि याचाच मला व माझ्या आरोग्य कर्मचारी व अधिका-याबाबत सार्थ अभिमान आहे. कर्मचा-याचा काम करण्याचा उत्साह बाढविण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा तसेच प्रत्येकाने आरोग्य कर्मचारी अथवा अधिकारी यांचेकडे सकारात्मक दृष्टीने बघावे जेणेकरुन त्यांचा काम करण्याचा उत्साह अबाधित राहील हिच त्यांच्या कार्याची पावती असेल -डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी