मोटारसायकल वरून विदेशी दारू विक्री करणाऱ्याला अटक स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यवाही

0
548
Google search engine
Google search engine

मोटारसायकल वरून विदेशी दारू विक्री करणाऱ्याला अटक

स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यवाही,

 

चांदुर बाजार :-

दिनांक 2 फेब्रुवारी रात्रीच्या 8 च्या दरम्यान रोजी पोलीस स्टेशन*शिरजगाव* हद्दीत ग्रामीण पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांची प्रो.जुगार, रेड करणे कामी पेट्रोलिंग करीत असता, गुप्तमाहीतीदार यांचेकडून माहिती मिळाली की, आरोपी सचिन राठोड वय 25 वर्षे राहणार आटनेर हा *बहिरम* मार्गाने दुचाकी वाहनांमध्ये अवैध रीत्या दारूची चोरटी वाहतूक करीत आहे .

या आधारे रेड केली असता, आरोपीच्या ताब्यातून विदेशी दारू च्या 14 नग 1 लीटर आयबी किंमत अंदाजे 10500/- रु व एक दुचाकी किंमत अंदाजे 45000/- रु व एक विवो कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 10000/- रुपये*असा एकूण 65,500 रु*. चा मुद्देमाल जप्त करून 01आरोपीसह पुढील कार्यवाही करीता पो स्टे* शिरजगाव* यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही पो.नि. तपन कोल्हे सा. सहायक पोलिस निरीक्षक अजय आकरे मार्गदर्शनाखाली नाईक पोलीस कॉस्टबल सुनील महात्मे नाईक पोलीस कॉस्टबल सय्यद अजमत नाईक पोलीस कॉस्टबल स्वप्निल तंवर नाईक पोलीस कॉस्टबल योगेश सांबारे नाईक पोलीस कॉस्टबल मंगेश लकडे यांनी केली.

फोटो मेल केला आहे.