*गो. सी. टोम्पे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन संपन्न*

0
399
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार :-

स्थानिक गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्व. संजय टोम्पे व स्व. समीर देशमुख यांच्या १७ व्या स्मृतीदिना प्रित्यर्थ राष्ट्रीय सेवा योजना, महिला तक्रार निवारण समिती, स्व. संजय टोम्पे व स्व. समीर देशमुख शिक्षण महाविद्यालय, अध्यापक विद्यालय आणि जेसिआय अमरावती गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरिता भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव मा. भास्करदादा टोम्पे, प्रमुख मार्गदर्शक व औषधोपचार तज्ञ डॉ. ऋषिकेश नागरकर, सौ. डॉ. रश्मी नागरकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, डॉ. राजेश बुरंगे, संचालक, रासेयो, संगाअवि, अमरावती, डाॅ. निलेश कडू, जिल्हा समन्वयक, रासेयो, प्राचार्य डॉ. संजय शेजव, प्र-प्राचार्य प्रशांत देवतळे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. मंगेश अडगोकर यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर प्रसिद्ध रोगनिदान तज्ञ डॉ. ऋषिकेश नागलकर व डॉ. सौ. रश्मी नागलकर, नागरकर नर्ससिंग होम अँड पोलीक्लिनिक ह्यांनी महाविद्यालयातील विदयार्थी व विदयार्थीनींना किशोर अवस्थेतील मुलामुलींकरीता आरोग्य विषयक समस्या निवारण व मार्गदर्शन या विषयावर उत्कृष्टपणे समुपदेशन केले. तसेच गरजू रुग्ण विदयार्थांना व विद्यार्थीनींना तपासणी करून औषधोपचार केले.
कार्यक्रमाची सुरवात संत गाडगे बाबा, संस्थाध्यक्ष स्व. गोविंदरावदादा टोम्पे, स्व. संजय टोम्पे व स्व. समीर देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. संजय सेजव यांनी स्व. संजय टोम्पे व स्व. समीर देशमुख स्मृतीस उजाळा देत त्यांच्या सामाजिक कार्यास सतत आठवण ठेवत महाविद्यालय दरवर्षी रक्तदान घेत असते मात्र यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुडवडा असल्यामुळे आपण युवक दिनानिमित्य रक्तदान शिबिर घेतले आणि आज उभयता डॉ. नागरकर यांच्या सहकार्याने रोगनिदान शिबिराचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन केले. तर श्री. भास्करदादा टोम्पे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. ऋषिकेश नागरकर व डॉ. रश्मी नागरकर यांनी हे रोग निदान शिबिर महाविद्यालयात घेऊन विदयार्थी व विदयार्थीनींना आरोग्य विषयी सजग व जागृत केले आणि त्यांनी त्यांचे मानसिक व शारीरिक व्याधी कशा कमी कराव्या या बाबत मार्गदर्शन तसेच तपासणी करून मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले. पुढे प्रसिद्ध रोगनिदान तज्ञ
डॉ. ऋषिकेश नागरकर यांनी विदयार्थ्यांना तर डॉ. रश्मी नागरकर यांनी विद्यार्थिनींना तारुण्यावस्थेत प्रवेश करतांना विविध शारीरिक बद्दल कसे होतात व त्याकडे दुर्लक्ष केल्यास काही आजाराची लक्षणे कसे वाढतात यावर पॉवर पॉईंटच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच वजन कमी होणे, डोके दुखणे, विशेषत: मुलींच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, शारीरिक दुर्लबलता वाटणे, पोट दुखणे इत्यादी किंवा या व्यतिरिक्त इतर आजाराबाबत लक्षणे असणाऱ्या विदयार्थ्यांना तपासणी करून औषधी उपचार केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रविकांत कोल्हे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. निधी दीक्षित, रासेयो, महिला कार्यक्रम अधिकारी, डॉ. प्रफुल्ल चौधरी, सहकार्यक्रम अधिकारी, डॉ. लालबा दुमटकर, डॉ. ज्योती चोरे, डॉ. प्रियदर्शनी देशमुख, डॉ. प्रिया देवळे, डॉ. प्रवीण परिमल, डॉ. धनंजय बिजवे, डॉ. उमेश कनेरकर, डॉ. नंदकिशोर गव्हाळे अथक परिश्रम घेतले. या शिबिराला महाविद्यालयातील बहुसंख्य विदयार्थी, विदयार्थीनीं, रासेयो स्वयंसेवक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.