*विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत शैक्षणिक व नवीन अद्यावत सुविधांसाठी ५० कोटीं निधीची मागणी ; आ. सुलभाताई खोडके यांचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन*

0
557
Google search engine
Google search engine

*आगामी अर्थसंकल्पीय भाषणात ५० कोटीच्या निधीची घोषणा करण्याची केली विनंती*

अमरावती १७ फेब्रुवारी : उच्च शिक्षणाबरोबबरच संशोधनाची सोय असलेले महाराष्ट्रातील एकमेव शासकीय महाविद्यालय म्हणजेच जुने विदर्भ महाविद्यालय व सध्याचे शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती हे आपल्या शतकपूर्तीकडे वाटचाल करीत आहे. या संस्थेत शैक्षणिक व पायाभूत सुविधा तसेच नवीन अद्यावत सुविधा निर्माण करण्याची गरज लक्षात घेता आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी ५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात विदर्भ महाविद्यालयासाठी ५० कोटी इतक्या निधीची घोषणा करावी अशी विनंती सुद्धा सुलभाताई खोडके यांनी उपमुख्यमंत्री महोदयांकडे पत्राद्वारे केली आहे.
विदर्भ महाविद्यालयाच्या विस्तीर्ण परिसर, येथील शैक्षणिक सुविधा तसेच वर्तमान स्थितीतील पायाभूत सुविधा व आगामी काळाची गरज लक्षात घेता याठिकाणी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा व नवीन अद्यावत विकासासंदर्भात आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांना पत्राद्वारे अवगत केले. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असून येथे नाविन्यपूर्ण संशोधनाची सोया देखील उपलब्ध आहे . त्यामुळे या संस्थेत आणखीन उच्च शिक्षणाच्या संधी व नावीन्यपूर्ण शिक्षणाचे विविध अभ्यासक्रम सुरू होणे ही आजची गरज आहे. तसेच याठिकाणी १२०० विद्यार्थी क्षमतेचे अद्ययावत अभ्यासिका व आंतरराष्ट्रीय दर्जाची ई-लायब्ररी साकारण्याची नितांत गरज आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी अद्ययावत असे क्रिकेटचे मैदान, तसेच वॉकिंग ट्रॅक सुद्धा निर्माण करणे हे क्रीडा विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. यासाठी ५० कोटी इतका खर्च अपेक्षित असल्याची बाबही आ. सुलभाताई खोडके यांनी पत्राद्वारे ना. मा. अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. विदर्भातील शैक्षणिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने विदर्भ महाविद्यालयाचा अद्ययावत बाबीतून विकास करणे व सर्वसामान्य मुलांना सर्व सोयीयुक्त शिक्षणाची सोय उपलब्ध करणे हि बाब आज निकडीची ठरू पाहत आहे. त्याकरिता सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये या सर्व बाबींचा अंतर्भाव करून यावर्षीच्या बजेटमध्ये ५० कोटी इतक्या निधीची घोषणा करावी. अशी मागणी आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान आ. सुलभाताई खोडके यांनी या संदर्भात ना . अजितदादा पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असता , त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली असून निर्णय घेण्याचे आश्वासन देखील दिले आहे . त्यामुळे आपल्या शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अर्थात विदर्भ महाविद्यालयाचा कायापालट होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.