दुचाकीवर आलेल्या एका महिला व पुरुषाकडून 4 वर्षाचा मुलाचे अपहरण

0
3432
Google search engine
Google search engine

अमरावती शहरातील  शारदा नगरमध्ये एका व्यावसायिकाच्या चार वर्षीय चिमुकल्याचे घरासमोर खेळत असताना स्पे.दुचाकीवर आलेल्या एका महिला व पुरुषाकडून अपहरण करण्यात आले आहे. ही धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना बुधवारी (दि. १७) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी माहिती मिळताच संपूर्ण शहर पोलिस दल या चिमुकल्याचा शोध घेत आहे, मात्र वृत्त लिहि पर्यंत बालकाचा शोध लागला नव्हता.
नयन मुकेश लुनिया (४, रा. शारदानगर) असे अपहृत बालकाचे नाव आहे. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नयन हा घरासमोर खेळत होता.