18 लॉनचालकांवर महापालिकेची कारवाई – पहा यादी व दंडाची रक्कम

0
6888
Google search engine
Google search engine

नियमांचे पालन करत नसल्‍यास दंडात्‍मक व फौजदारी कारवाई

मनपा आयुक्‍त

नियमांचे पालन करत नसल्‍यास दंडात्‍मक व फौजदारी कारवाई करण्‍याचे निर्देश महानगरपालिका आयुक्‍त यांनी आज संबंधित यंत्रनेला दिले. नागरिकांनीही सद्याची स्थिती लक्षात घेता दक्षता पाळणे फार महत्‍वाचे आहे.

कोव्‍हीड – 19चा प्रादुर्भाव रोखण्‍यांच्‍या अनुषंगाने स्‍वच्‍छता विभागाव्‍दारे 1 फेब्रुवारी 2021 ते 18 फेब्रुवारी 2021 पर्यंत 1 लाख 90 हजार 600 रुपये इतका दंड वसुल केला आहे. मास्‍क न बांधने, सामाजिक अंतर न पाळणे यासाठी दंड करण्‍यात आला आहे. बाजार व परवाना विभाग व पशुशल्‍य चिकीत्‍सक विभाग यांच्‍या मार्फत लॉन, मंगल कार्यालय यांच्‍यावर दंडात्‍मक कार्यवाही करण्‍यात आली आहे. शहरातील 18 मंगल कार्यालयावर दिनांक 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्‍यान दंडात्‍मक कार्यवाही करण्‍यात आली आहे. खंडेलवाल लॉन 20 हजार, बेबी पर्ल मंगल कार्यालय 10 हजार, तेलाई मंगल कार्यालय 70 हजार, राजवाडा मंगल कार्यालय 10 हजार, बालाजी मंगल कार्यालय 10 हजार, शहनाई मंगल कार्यालय 30 हजार, प्रभादेवी मंगल कार्यालय 15 हजार, कमल प्‍लाजा 20 हजार, सिध्‍दार्थ मंगलम 30 हजार, कांचन रिसॉर्ट 50 हजार दंड वसुल करण्‍यात आला आहे. तर लाली लॉन 2 लाख 50 हजार, व्‍हाईट हाऊस लॉन 2 लाख 50 हजार, नेमाणी ईन 80 हजार, कल्‍पदिप मंगल कार्यालय 1 लाख, ताज पॅलेस 2 लाख 50 हजार, रॉयल पॅलेस 2 लाख 50 हजार, आलीशान पॅलेस 2 लाख 50 हजार, पाकीजा हॉल 2 लाख 50 हजार यांना दंडात्‍मक नोटीस देण्‍यात आल्‍या आहे.