*प्रतिबंध गुटख्या वर स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई* अन्न व औषध प्रशासन बरोबर स्थानिक पोलिसांची चुप्पी?

0
549
Google search engine
Google search engine

*प्रतिबंध गुटख्या वर स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई*

अन्न व औषध प्रशासन बरोबर स्थानिक पोलिसांची चुप्पी

 

चांदुर बाजार :-

 

चांदुर बाजार शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू आहे मात्र याकडे स्थानिक पोलीस प्रशासन बरोबर अन्न व औषध प्रशासन विभागचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असताना दिनांक 18 फेब्रुवारी ला स्थानिक गुन्हे शाखेचे टीम च्या कार्यवाही मुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यभार प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

18/02/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे टीम अचलपूर डिवीजनमध्ये गस्त दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील खराला या ठिकाणी उमेश रामेश्वर जगताप, वय 36 वर्ष, रा. खराडा च्या कडे रेड केली असता त्याच्या ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्या तसेच अवैधरित्या साठवणूक प्रकरणी कार्यवाही करण्यात आली.या कार्यवाही मध्ये पान पराग प्रीमियम कीं. 35,800/-₹,पान बहार कीं. 10,000/-₹,जॅक पॉट 777 प्रीमियम कीं.17,600/-₹,नागपुरी प्रीमियम गुटखा कीं. 23,800/-₹, नजर 1000 पान मसाला कीं. 10,000/-₹,H-5 प्रीमियम गुटखा कीं. 8,000/-, N-5 प्रीमियम गुटखा कीं. 14,250/-₹, MZ 007 तंबाखू कीं. 10,800/-₹,H-2 प्रीमियम तंबाखू कीं. 6,800/-₹,नजर गुटखा लहान कीं. 4,700/-₹, नजर प्रीमियम गुटखा मोठी कीं. 2,800/-₹,नजर 9000 प्रीमियम गुटखा कीं. 3,600/-₹,हॉट प्रीमियम पान मसाला कीं.4,000/-₹
*एकूण जप्त मुद्देमाल: 1,52,150/-₹ जप्त करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक, . डॉ. हरी बालाजी एन., अप्पर पोलीस अधीक्षक शाम घुगे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. तपन कोल्हे साहेब यांचे आदेशाने स.पो.नि गोपाल उपाध्याय,पो.हे.का. त्र्यंबक मनोहर,ना.पो.का. प्रमोद खर्चे, ना.पो.का. नीलेश डांगोरे,पो.का. प्रवीण अंबाडकर,पो.का. अमोल केंद्रेचालक गोवर्धन नाईक यांनी केली.

बॉक्समध्ये
तालुक्यातील देउरवाड़ा शिरजगाव कसबा,करजगाव ब्राम्हण वाडा थडी ,घातलाडकी,चांदुर बाजार या ठिकाणी मोठं मोठे अवैध गुटखा तस्कर तयार झाले असून याच्या वर कार्यवाही साठी अन्न व औषध प्रशासन विभाग बरोबर स्थानिक पोलीस विभाग यांची या प्रकाराला मूक संमती असल्याचे समजते आहे.