भारतीय महाविद्यालयात शिवजयंती कार्यक्रम संपन्न

0
925
Google search engine
Google search engine

अमरावती प्रतिनिधी :
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित भारतीय महाविद्यालय अमरावती येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रातील जनतेचा दैवत म्हणून ज्या शिवाजी महाराजांकडे बघितला जातो, त्या शिवाजी महाराजांच्या विचाराचं आदर्शाचा पालन प्रत्येकाने करावा व स्वतःचे सुरक्षितता बाळगावी असा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राचार्य डॉ आराधना वैद्य यांनी दिला.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे पाच जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाला डॉ. प्रशांत विघे कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. सुमित वरघट सह-कार्यक्रम आधिकारी, ऋषिकेश कोईचाडे विद्यार्थी प्रतिनिधी राष्ट्रीय सेवा योजना सर्वेश पिंप्राळे, अक्षय गुल्हाने उपस्थित होते