कोरोनाच्या सावटखाली चिमुकल्यानि केली छत्रपती यांची जयंती साजरी मोठ्यांना ही दिला आदर्श ,मास्क आणि सॅनिटायझर वापर

0
641
Google search engine
Google search engine

कोरोनाच्या सावटखाली चिमुकल्यानि केली छत्रपती यांची जयंती साजरी

मोठ्यांना ही दिला आदर्श ,मास्क आणि सॅनिटायझर वापर

 

चांदुर बाजार:-

वाढत्या कोरोना मुळे विद्यार्थी यांच्या शाळा बंद झाल्या मात्र यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शाळेत साजरी करण्यात आली नाही म्हणून किंबहुना आपल्याला जयंती ला जायला मिळणार नाही म्हणून तालुक्यातील काजळी येथील 12 वर्ष वयोगटातील मुलांनी आपल्या घराजवळ सवंगडी याना सोबत घेऊन शिव जयंती साजरी केली.

यावेळी एक छोटेखानी कार्यक्रम या मुलांनी घेऊन आदर्श निर्माण केला.या कार्यक्रमात अध्यक्ष पियुष सुने,उपाध्यक्ष आदर्श दामेधर,सचिव कैवल्य सुने,प्रमुख पाहुणे प्रथमेश निचत तर प्रास्ताविक योगीनि दामेधरआणि प्राची सुने हिने केले तर रोचक कपले याने सुंदर असे गीत सादर केले.या कार्यक्रमात जान्हवी सुने,हिने भाषणातून महाराज यांचे सुंदर विचार व्यक्ती केले.तर ओम पापडकर आणि बच्चू टिंगणे यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.यावेळी आयुष निचत ,नंदिनी सुने,श्रद्धा निचत,यांनी सुद्दा या चिमुकल्या च्या कार्यक्रम ला उपस्थिती दर्शविली.

या कार्यक्रमात सर्वाना मास्क आणि सॅनिटायझर आवश्यक करण्यात आले होते.तर काजळी ग्रामपंचायत मध्ये देखील सरपंच अरविंद कपले,उपसरपंच किशोर थोराईत सदस्य सविता अवसरमोल, सुनीता राजस,ग्रामस्थ राजेश घोटकर,दिनेश सुने,निलेश राजस, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन देशमुख यांच्या उपस्थितीत सोशल अंतर आणि मास्क चा वापर करत शिवजन्मोत्सव आनंदाने साजरा करण्यात आला.