किमान वेतन अधिनियमाबाबत ऑनलाईन जनजागृती सप्ताह *व्यवसाय, उद्योगमालकांनी कामगारांना किमान वेतन देणे बंधनकारक* – *कामगार उपायुक्त वि. रा. पाणबुडे*

0
813
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 25 : किमान वेतन अधिनियमानुसार व्यवसाय व उद्योगमालकांनी कामगारांना किमान वेतन देणे बंधनकारक असून, तसा दस्तऐवजही ठेवला पाहिजे, असे निर्देश कामगार उपायुक्त वि. रा. पाणबुडे यांनी दिले.

किमान वेतन अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयाकडून ऑनलाईन जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त त्यांनी सर्व उद्योग, व्यावसायिकांना आवाहन केले आहे. कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू असल्याने ऑनलाईन उपक्रम राबविण्यात येत असल्याचे श्री. पाणबुडे म्हणाले.

ते म्हणाले की, मालक व व्यापारी असोसिएशन, कामगार, कामगार संघटना यांच्याशी ऑनलाईन पद्धतीने संपर्क साधून किमान वेतन अधिनियम 1948 तरतुदींबाबत माहिती देण्यात येत आहे. वीटभट्टी, बांधकाम येथील कामगार, असंघटित कामगारांना, तसेच विविध आस्थापना, दुकाने, उपाहारगृहे, हॉटेल्स, खाणावळी, कारखाने, दवाखाने आदी 67 अनुसूचित उद्योगांतील कामगारांसाठी जे किमान वेतन दर निश्चित केले आहेत, ते मालकांनी त्यांना धनादेशाद्वारे देणे बंधनकारक आहे. त्याचे पालन करून हजेरी व वेतन रजिस्टर मालकाने ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या (0721) 266 2115 या दूरध्वनीवर किंवा dyclamravati56@gmail.com वर संपर्क साधावा.