मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आमदार देवेंद्र भुयार यांचा सत्कार ! 

0
2030
Google search engine
Google search engine
मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आमदार देवेंद्र भुयार यांचा सत्कार !
मोर्शी वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण !
विदर्भातील संत्राला लवकरच मिळणार राजाश्रय !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :
आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरूड तालुक्यात नागपुरी संत्रावर प्रक्रिया करणारा अत्याधुनिक संत्रा प्रकल्प मंजूर करून आणल्याबद्दल आज आमदार देवेंद्रभाऊ भुयार यांचा वरुड मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अमरावती रेल्वेस्थानक येथे सत्कार करण्यात आला . त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, कोषाध्यक्ष विलास राऊत, उपाध्यक्ष रुपेश वाळके, राष्ट्रवादी युवक काँगेस शहर अध्यक्ष अंकुश घारड, राजेश ठाकरे, संत्रा उद्योजक निलेश रोडे, कमलेश रोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, अमोल महल्ले, डॉ प्रदीप कुऱ्हाडे, आनंद सदातपुरे, शुभम तिडके, गजानन वानखडे, आकाश नागपुरे,  यांच्यासह आदी संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते .
       मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विदर्भातील फलोत्पादन क्षेत्रातील सर्वात मोठे क्षेत्र असलेल्या संत्राला लवकरच राजाश्रय मिळणार आहे. संत्रावर प्रक्रिया व ज्युसनिर्मिती प्रकल्पाला मान्यता मिळाली असून राज्यातील फलोत्पादन क्षेत्रातील १ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखालील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना या भागामध्ये एकही संत्रा प्रक्रिया प्रकल्प नसल्यामुळे संत्रफळे व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय नाही. व्यापारी देतील त्या भावात संत्रा विकावा लागतो यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक गळचेपी होत आहे. व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या भावावरशेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे. मात्र आता मोर्शी वरुड तालुक्यामध्ये नागपुरी संत्रावर प्रक्रिया करणारा अत्याधुनिक संत्रा प्रकल्प मंजूर झाल्यामुळे त्याचा फायदा आता विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
या भागामध्ये संत्रावर प्रक्रिया करणारा अत्याधुनिक संत्रा प्रकल्प उभा होणार असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. नागपुरी संत्रापासून ज्यूस व पल्प निर्मिती यासह इतर प्रॉडक्ट तयार केले जाणार असल्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादकासह विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
      विदर्भातील संत्राची चव ही जागतिक स्तरावर उच्च दर्जाची आहे. संत्रामध्ये असणारे विविध घटक व गुणधर्म महत्वाचे असून हा नागपुरी संत्रा टिकावा व या संत्रावर प्रक्रिया व्हावी परिणामी प्रक्रिया उद्योग निर्माण व्हावे याकरिता मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्रभाऊ भुयार यांनी एक वर्षांपासून सातत्यपूर्ण मागणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे रेटून धरली होती.याची दखल घेऊन विदर्भातील नागपुरी संत्रावर प्रक्रिया होणार अत्याधुनिक संत्रा प्रकल्प निर्माणाधिन होण्याची घोषणा अर्थ संकल्पिय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केली त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार देवेंद्र भुयार यांचे मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले .