व्यवसाय कर 31 मार्चपूर्वी भरण्याचे शासनाचे आवाहन

0
832
Google search engine
Google search engine

            अमरावती, दि. 13 : नावनोंदणी धारक तथा नोंदणी धारक व्यवसायकरदात्यांनी आपला सन २०२०-२१ या वर्षाचा देय व्यवसायकर 31 मार्च 2021 पूर्वी भरण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

            नवीनच करपात्र झालेल्या करदात्यांनी कायद्याप्रमाणे नावनोंदणी किंवा नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.mahagst.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन नावनोंदणी किंवा नोंदणी प्रमाणपत्र मिळवावे आणि सन 2020-21 या वर्षाचा देय व्यवसायकर 31 मार्च 2021 पूर्वी भरावा, असे महाराष्ट्र व्यवसाय कर विभाग यांनी कळविले आहे.