जिल्ह्यात गौवंश तस्करी ला उधाण, स्थानिक पोलीस गप्प का ? ,  स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम ची धडक कार्यवाही,31 गौवंश यांची जिवंत सुटका

0
536
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार :-

अमरावती जिल्हात गौहत्या बंदी कायदा तसेच गौमास विक्री कायदा हा फक्त कागदावर च असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशन हद्दीत हे दोन्ही प्रकार सुरू असताना स्थानिक पोलीस यावर कार्यवाही का करीत नाही अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तत्कालीन ग्रामीण पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी या कडे जातीने लक्ष घालून जिल्ह्यातील एक हजार वर जिवंत गौवंश यांची सुटका केली होती.त्याचप्रमाणे अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांनी या प्रकरणी गंभीर होऊन स्थानिक पोलिसांना कार्यवाही बाबत सूचना द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे.

दिनांक 10 मार्च ला परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील मल्हारा या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्यय यांच्या टीम ने कार्यवाही करत 31 गौवंश यांची जिवंत सुटका केली आहे.त्यांच्या या कार्यवाही मुळे परतवाडा पोलीस स्टेशन बरोबर जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन च्या कार्यभार ची चर्चा जिल्ह्यात जोरात सुरू आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या या कार्यवाही मध्ये 1) 31 बैल जातीचे गोवंश किं. अं.रू. 305000 /-
2) 5 मोबाईल किं.अं.रू. 14000/- 3)1बांबूची काठी किं.अं.रू.20/-
*एकूण जप्त मुद्देमाल: किं.रू.319020 जप्त करण्यात आला.तर आरोपी (1)दिलदास बिहारी आठवले वय ४0 वर्ष अधिक 6 सर्व रा. गंगारखेडा ता. चिखलदरा याच्या सह 7 आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला.

या कार्यवाही मुळे जी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळते ती स्थानिक पोलिसांना का नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.तर जिल्ह्यातील वरुड ,मोर्शी,बेनोडा, शिरखेड,चांदूर बाजार,ब्राह्मणवाडा थडी,शिरजगाव कसबा ,आसेगाव तिवसा पोलीस स्टेशन मधील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या हद्दीतील गौवंश वाहतूक वर कधी कार्यवाही करतील हा प्रश्न आहे.तसेच चांदुर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गौवंश चोरीला जात असून पोलीस विभागला त्याचा सुगावा देखील लागला नाही त्यामुळे ही गौवंश कोठे जात आहे हा प्रश्न पोलीस विभाग बरोबर सामान्य नागरिक यांच्या देखील चर्चेचा विषय बनला आहे.