आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते वरुड पोलिस कर्मचार्‍यांचा कोरोंना योद्धा म्हणून सन्मान ! 

0
1350
Google search engine
Google search engine
आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते वरुड पोलिस कर्मचार्‍यांचा कोरोंना योद्धा म्हणून सन्मान !
वरुड तालुका प्रतिनिधी :
वरुड येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या  हस्ते कोरोना काळात उत्कृष्ठ सेवा देणारे वरुड पोलिस स्टेशन कार्यालयातील हेड पोलीस कॉन्स्टेबल रुपराव कडू, पोलीस कॉन्स्टेबल उमेश ढेवले,  रवींद्र धानोरकर ,दीपक पंधरे, परमेश्वर काकड,गजानन गिरी यांच्याह विविध पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
     यावेळी ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीद वाक्याला अनुसरून पोलीस बांधव आपले कर्तव्य करत असतात. त्यातून जेव्हा एखादे मानवतावादी कामगिरी त्यांच्या हातून घडते त्यावेळेस पोलिसांचा, त्यांच्या कामगिरीचा मला प्रचंड अभिमान वाटतो, असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनि केले.
       वरुड पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस हेड पोलीस कर्मचारी यांनी कोरोंना काळात उत्कृष्ठ सेवा देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली. दरम्यान कार्यरत असतांना पोलिस कॉन्स्टेबल उमेश ढेवले व रवींद्र धानोरकर या कोरोंना योध्यांना कोरोनाची लागण झाली तरी कोरोनावर  मात करत  हे कोरोंना योद्धे सेवेत रुजू झाले. यांच्या कार्याची दखल घेत मोर्शी  विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड पोलिस स्टेशन येथे जाऊन हेड पोलीस कॉन्स्टेबल रुपराव कडू, पोलीस कॉन्स्टेबल उमेश ढेवले,  रवींद्र धानोरकर ,दीपक पंधरे, परमेश्वर काकड,गजानन गिरी यांच्यासह विविध पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला. यावेळी पोलिस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांनी आमदार भुयार यांचे स्वागत केले. कोरोंना काळात उत्कृष्ठ सेवा देणारे सर्व पोलिस बंधूंचे कार्य उल्लेखनीय व प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.
   यावेळी आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळू कोहळे पाटील, पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश हिवसे, पोलीस उपनिरीक्षक के.डी. साळुंके, पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील, नगरसेवक महेंद्र देशमुख, प्रभाकर काळे, ऋषिकेश राऊत, निखिल बनसोड, गौस अली, सारंग काळमेंघ, मोहसिन मिर्झा, हर्षल घोरमाडे, पोलीस कॉन्स्टेबल जगदीश खानवे,  पोलिश कर्मचारी गजानन सुंदरकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनल खाडे, आरती सर्याम यांच्याह आदी मंडळी उपस्थित होती .