आज दापोरी येथे शेतकऱ्यांंविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन .

0
854
Google search engine
Google search engine
आज दापोरी येथे शेतकऱ्यांंविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन .
दापोरी येथे अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग .
मोर्शी तालुका प्रतिनिधी :
शेतकऱ्यांंविषयी सहवेदना व्यक्त करण्यासोबत त्यांच्या विषयीची बांधिलकी बळकट करण्यासाठी तसेच ज्या धोरणांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्या धोरणांचा निषेध करण्यासासाठी दापोरी येथे आज ठिकठिकाणी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.
      शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे समाजाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दर वर्षी १९ मार्च रोजी संवेदनशील नागरिक एक दिवस अन्नत्याग करतात. या वर्षीही अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या वर्षी नागरिकांनी अन्नत्याग करून आपल्या भावना व्यक्त कराव्यात, असे आवाहन बळीराजा संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष रुपेश वाळके यांनी केले आहे.
        बळीराजाची आत्महत्या हा महाराष्ट्राच्या प्रत्येक समाजमनाला लागलेला एक जिव्हारी चटका आहे. १९ मार्च १९८६ रोजी पहिल्यांदा एक फास आवळला गेला. या दिवशी सुरु झालेल्या दुष्टचक्रातून अजुनही बळीराजा सुटलेला नाही. चिलगव्हाणच्या त्या पहिल्या आत्महत्येच्या कटू आठवणीनिमित्त आज दापोरी येथील शेतकरी अन्नत्याग आंदोलन करणार आहे.
        अस्वस्थ असलेल्या साहेबरावांनी पत्नी मालती व चार अपत्यांना घेऊन पवनार आश्रमात जेवणात विषारी औषध कालवून आत्महत्त्या केली. मृत्यपूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रात ‘शेतकरी म्हणून जगणे कठीण झाले आहे’ असे नमूद केलं. ते पत्र समस्त शेतकरी समाजाची दु:खद कैफियत सांगणारे होते. साहेबराव यांच्या आत्महत्येने सारा महाराष्ट्र हादरून गेला. या दुर्दैवी घटनेला ३५ वर्ष पूर्ण झालीत.
          आताही बळीराजा नापिकी, कर्ज आणि सरकारी अनास्थेचा बळी ठरतोय. या पार्श्वभूमीवर देशभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याविरूध्द सहवेदना व्यक्त करण्यासाठी राज्यभर शेतकऱ्यांवर प्रेम करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक आज अन्नत्याग आंदोलन करीत आहेत.
       शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राजकीय क्षेत्रातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. आज दापोरी येथे अन्नत्याग आनोदलनासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, माजी महिला बाल कल्याण सभापती सौ वृषालीताई विघे, बळीराजा संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष रुपेश वाळके , समीर विघे, निखिल फलके, दिनेश अंधारे, स्वप्नील ढोमने, दिनेश वाळके, श्रीकांत विघे, जगदीश सकर्डे, सतीश गतफने, यांच्यासह शेकडो शेतकरी मंडळी या आंदोलनात सहभागी होणार आहेत .
प्रतिक्रिया ………
अवघा समाज शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. अन्नत्याग आंदोलनातील सर्वसामान्यांचा सहभाग हे त्याचेच प्रतीक आहे, मात्र शेतकऱ्यांनी हताश होऊन आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये. त्यामुळे समस्या सुटणार नाही. सरकारनेही मानसिक खच्चीकरण होणार नाही, शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये यासाठी शासनाने उपाय योजना करून याकडे लक्ष द्यावे. त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी समुपदेशन करण्याचा प्रयत्न करावा.  – रुपेश वाळके अध्यक्ष बळीराजा संत्रा उत्पादक संस्था .