आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते वरुड तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींना टँकर वाटप !

0
1136
Google search engine
Google search engine
आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते वरुड तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींना टँकर वाटप !
वरुड तालुका प्रतिनिधी :
वरुड तालुक्यात पाणी टंचाई परिस्थितीत नागरिकांना पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरने सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी वरुड येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत वरुड तालुक्यातील पळसोना,झटामझीरी,लिंगा,सातनूर,बेनोडा,राजुरा बाजार,जरूड,वाठोडा, लोणी,टेम्भुरखेडा, शहापूर या ११ ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे करण्यात आले वाटप करण्यात आले. त्यावेळी ११ गावातील सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्यांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.
 त्यावेळी आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळू कोहळे पाटील, प.स.सदस्य शिल्पाताई पवार,माजी सभापती निलेश मगर्दे, प्रभाकर काळे, संदीप खडसे, ऋषीकेश राऊत,संजय कानुगो,सुमित गुर्जर,मनोज इंगोले,भगवन्त वानखडे, सोपान ढोले,निखिल बनसोड,भूषण चौधरी, गोपाल गोहत्रे, राहुल श्रीराव,निलेश वानखडे,कपिल बिडकर, समशोद्दीन काजी,गणेश चौधरी यांच्या सह टेम्भुरखेडा येथील सरपंच रोशनीताई निंबोरकर,जरूड येथील सरपंच सुधाकर मानकर,लोणी येथील सरपंच अश्विनीताई दवंडे,पळसोना  येथील सरपंच वंदनाताई गुर्जर,झटामझीरी हिरकांत उईके,लिंगा येथीलअश्विनीताई तागडे,सातनूर येथील सरपंच शिल्पाताई बरडे, बेनोडा येथील सरपंच रजनीताई कुबडे,राजुरा बाजार येथील सरपंच निलेश धुर्वे, वाठोडा येथील सरपंच सुजाता गायकी,शहापूर येथील सरपंच एस.आर.पाटील यांच्यासह सर्व गावातील उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य ग्रामसेवक आदी मंडळी उपस्थित होते .