फटाके फोडणाऱ्या सायलेन्सर बुलडोजरने केले नेस्तेनाबुत….अकोला शहर वाहतूक शाखेची धडाकेबाज कारवाई

0
1235
Google search engine
Google search engine

अकोलाः शहरात काही दिवसा पूर्वी पासून डुप्लिकेट सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात फटाके फोडणाऱ्या बुलेट राजांनी धुमाकूळ सुरू केला होता, ह्याच्या तक्रारी काही जेष्ठ नागरिकांनी शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना केली असता त्यांनी सदर बाब गंभीरतेने घेऊन अश्या बुलेट राजा विरुद्ध शहर वाहतूक शाखे तर्फे धडक मोहीम सुरू केली होती

2 ते 3 महिन्यात अश्या डुप्लिकेट सायलेन्सर लावलेल्या व मोठ्या आवाजात फटाके फोडून सर्वसामान्य नागरिक व विशेष करून जेष्ठ नागरिकांना त्रास देणाऱ्या अश्या जवळपास 60 बुलेट वाहतूक शाखेत लावून त्यांचे विरुद्ध कायदेशीर दंडात्मक कारवाई करून त्यांनी लावलेले डुप्लिकेट सायलेन्सर बदलून मूळ सायलेन्सर लावूनच सदरच्या दुचाकी सोडण्यात येत होत्या,

अश्या डुप्लिकेट सायलेन्सर चा ढीग वाहतूक कार्यालयात लागला होता, मुळातच एवढ्या महागड्या बुलेट वापरणारे युवक हे धनाढ्य कुटुंबातून आलेले व सामाजिक व राजकीय वजन असलेले होते, त्या मुळे अश्या बुलेट वर कारवाई न करण्यासाठी तसेच काढलेले सायलेन्सर परत द्यावे म्हणून भरपूर दबाव वाहतूक कर्मचारी व अधिकाऱ्यांवर येत होता, परंतु कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सदरची धडक मोहीम राबविणे सुरूच ठेवले,

वाहतूक कार्यालयात लावलेल्या डुप्लिकेट सायलेन्सर कायदेशीर रित्या नष्ट करण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरूच ठेवले, शेवटी न्यायालयाचा लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतर आज दिनांक 25।3।21 रोजी रोड रोलर खाली वाहतूक कार्यालयात जमा असलेले डुप्लिकेट सायलेन्सर त्या खाली चिरडून नष्ट करण्यात आले,

त्याचा रीतसर पंचनामा सुद्धा करण्यात आला।सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी पार पाडली

अकोला शहरातील असे डुप्लिकेट सायलेन्सर लावून मोठा आवाज करीत फिरणाऱ्या युवकांना आवाहन आहे की सामाजिक भान व जबाबदारी ओळखून असे डुप्लिकेट सायलेन्सर स्वतः हुन काढून यावे नाही तर कारवाईला तयार राहावे।

पोलीस निरीक्षक गजानन शेळके