शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या वर्धा ड्रायव्हर्शन सिंचन प्रकल्पाला १ हजार १०९ कोटी २३ लक्ष रुपयांची सुधारित प्रशासकीय  मान्यता ! 

0
912
Google search engine
Google search engine
शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या वर्धा ड्रायव्हर्शन सिंचन प्रकल्पाला १ हजार १०९ कोटी २३ लक्ष रुपयांची सुधारित प्रशासकीय  मान्यता !
आमदार देवेंद्र भुयार यांनी मिळवून दिला वर्धा ड्राय व्हर्शन प्रकल्पाला राजाश्रय !
 ४० गावातील ९ हजार १९१ हेक्टर क्षेत्र बंदिस्त नलिकेद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचणार पाणी .
वरुड तालुका प्रतिनिधी :
मोर्शी विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या वरुड मोर्शी तालुक्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेने, बंदिस्त पाईप लाईनद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पूर्ण पाणी देऊन सिंचनाची सोय उपलब्ध करणे, संत्रा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रकल्पावर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीची कामे व सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी व रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी माजी कृषी मंत्री तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या समस्या मिटविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जल संपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करून वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या पंढरी मध्यम वर्धा ड्राय व्हर्शन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याकरिता १ हजार १०९ कोटी २३ लक्ष रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता २४ मार्च रोजी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये मिळवून दिल्याबद्दल वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
       अमरावती जिल्ह्यात सिंंचनाखालील सर्वात मोठे क्षेत्र वरुड मोर्शी  तालुक्यात आहे. संत्रा बेल्ट म्हणून या परिसराची जगात ख्याती आहे. संत्रा टिकविण्याकरिता आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघावा म्हणून सुपर एक्सप्रेस वर्धा डायव्हर्शन कॅनल दहा वर्षांपासून पासून या प्रकल्पाचे काम रखडले होते. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा वर्धा डायव्हर्शन प्रकल्पाला राजाश्रय मिळन्याच्या प्रतीक्षेत शेतकरी होते.
    वरुड तालुक्यातील भूजल पातळी अतिउपस्यामुळे १२०० फुट खोलीवर गेली . पिण्याच्या पाण्यासह सिंंचनाचा प्रश्न निर्माण झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी जलसंकटाने त्रस्त होऊन संत्राबागा सुकू लागल्याने विदर्भाचा कॅलीफोर्निया वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे . यातच भूजल खात्याने डार्क झोन म्हणून तालूक्यातील पाण्याची पातळी गत १० ते १५ वर्षांपासून खोलवर गेल्याने व संत्राबागा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून वरुड तालुक्यातील नद्या बारमाही वाहत्या करण्याकरिता मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी पंढरी मध्यम ( वर्धा ड्रायव्हर्शन ) प्रकल्पाचा अभ्यास करून हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरणारा असल्याची खात्री पटल्याने त्या दिशेने अविरत प्रयत्न करून शासनदरबारी सातत्याने  पंढरी मध्यम ( वर्धा डायव्हर्शन) प्रकल्पाचा मुद्दा रेटून धरला.  त्यामुळे वर्धा ड्रायव्हर्शन पंढरी मध्यम प्रकल्पा करीता १ हजार १०९ कोटी २३ लक्ष रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
त्यामध्ये प्रकल्पाचे उर्वरित संपूर्ण बांधकाम प्रकल्पाची घळभरणी जून २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये या वर्षीच्या पावसाळ्यात ८० ते ९० टक्के पाणी साठा निर्माण होईल .
पंढरी मध्यम वर्धा ड्राय व्हर्शन प्रकल्पाचे राहिलेले अपूर्ण काम बंदिस्त नलिकेद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचविण्याचे काम केले जाणार असून  वरुड तालुक्यातील ४० गावातील ९ हजार १९१ हेक्टर क्षेत्र बंदिस्त नलिकेद्वारे सिंचन केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या डाव्या मुख्य कालव्यामधून ४४४ हेक्टर क्षेत्र आणि उजव्या मुख्य कालव्यामधून ८७४७ हेक्टर क्षेत्र असे एकून ९ हजार १९१ हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार असून या कालव्याद्वारे वितरित करण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी वाटप संस्था निर्माण करून शेतकऱ्यांना पाणी वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
          दहा वर्षांपासून रखडलेल्या ( वर्धा ड्रायव्हर्शन ) पंढरी मध्यम प्रकल्प पूर्णत्वास नेण्याकरिता आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नाने निवडून आल्यानंतर पहिली बैठक दि. १९/१२/२०१९ रोजी त्री सदस्य उपसमितीची बैठक मुंबई येथे लावून प्रकलाचे काम मार्गी लावण्याची सुरुवात केले. त्यानंतर पाट बंधारे नियामक मंडळ यांची २०/०१/२०२० रोजी बैठक होऊन त्यामध्ये सदर प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावास मंजुरी प्रदान करून कार्यकारी संचालक विदर्भ पाट बंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्याकडे प्रस्ताव पाठविला . त्यानुसार विदर्भ पाट बंधारे विकास महामंडळ नागपूर यांनी २३/३/२०२० चे बैठकीमध्ये मान्यता देऊन सदर प्रस्ताव मान्यतेकरिता शासनाकडे सादर केला दिनांक १३/१०/२०२० रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेऊन सादर प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावास शासनाच्या मान्यतेसाठी ठेवण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले त्यानुसार दिनांक २४/३/२०२१ च्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंढरी मध्यम प्रकल्प वर्धा ड्राय व्हर्शन प्रकल्पाला १ हजार १०९ कोटी २३ लक्ष रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी  प्रदान करण्यात आली.
प्रतिक्रिया :
 शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा पंढरी मध्यम वर्धा ड्रायव्हर्शन सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याकरिता शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी मला सतत प्रोत्साहन देऊन वेळोवेळी येणाऱ्या प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी सतत मार्गदर्शन करून मला प्रोत्साहित केले त्यामुळे वरुड मोर्शी तालुक्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा निर्णय घेवून वरुड मोर्शी तालुका दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला. मोर्शी मतदार संघातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माझ्या मागणीची दखल घेऊन  पंढरी मध्यम वर्धा ड्राय व्हर्शन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याकरिता सन २०२० — २१ च्या अर्थसंकल्पात १ हजार १०९ कोटी २३ लक्ष रुपयांच्या कामास सुधारित प्रशासकीय मंजुरात देऊन निधीची तरतूद केली.