*केंद्रीय पथकाने रुग्णालयांची पाहणी केली*

0
1464
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. ११ : केंद्रीय आरोग्य पथकाने आज शहरातील कोविड रुग्णालयांची पाहणी केली.

दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील तज्ज्ञ डॉ. अमितेश गुप्ता व डॉ. संजय राय यांचा पथकात समावेश आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. विशाल काळे आदी यावेळी उपस्थित होते.
पथकाने जुन्या बडनेऱ्यातील हरिभाऊ वाठ महापालिका रुग्णालय, तसेच महेशभवन येथील कोविड रुग्णालयाला भेट दिली. पथकाने आज शारदानगर येथील प्रतिबंधित क्षेत्रालाही भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधला, तसेच आरोग्य यंत्रणेकडून उपचार सुविधांची माहिती घेतली.

०००