तिवसा येथे राष्ट्रवादीचे ब्लड फॉर महाराष्ट्र अभियान

0
820
Google search engine
Google search engine

 

तिवसा :-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार मा. शरदचंद्र पवार, यांच्या संकल्पनेतून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा होऊ नये याकरिता “ब्लड फॉर महाराष्ट्र” अभियान राबविण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिवसा तर्फे पुढाकार घेऊन दिनांक २१/०४/२०२१ला ग्रामीण रुग्णालय तिवसा, येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरामध्ये ४६ रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिराला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वर्हाडे यांनी भेट दिली राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष डॉक्टर सुभाष तवर, शहराध्यक्ष अजय सुरटकर, युवक तालुकाध्यक्ष हेमंत बोबडे, मागासवर्गीय सेल अध्यक्ष विलास वावरे, जिल्हा सचिव पुरुषोत्तम दाते, संजय पोल्हाड, आकाश लांजेवार,मोहन अर्मळ, विजय पाटील,निखिल प्रधान,करून वनवे, अंकुश लेकुरवाळे,आनंद सुरटकर,स्वप्निल शापामोहन,विकी साबळे यांनी रक्तदान शिबीर यशस्वीते साठी प्रयत्न केले.