लोकडाऊन च्या पहिल्या चरणात, शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई, 8 हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई, 350 वाहने जप्त

0
1082
Google search engine
Google search engine

अकोलाःवाढता करोना प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने दिनांक 15।4।21 पासून संपूर्ण महाराष्ट्रात कडक लॉक डाऊन जारी केला, त्या अंतर्गत संचारबंदी लागू करून फक्त जीवनावश्यक वस्तूची दुकाने, मेडिकल वगळता सर्व आस्थापने बंद केली, जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुद्धा निर्धारित वेळेतच सुरू ठेवली, कोरोनाचा वाढता संसर्ग कमी व्हावा व प्रदूर्भावाची चेन तुटावी ह्या उद्देशाने लागू केलेल्या ह्या लॉक डाऊन चा मूळ उद्देश लोकांची गर्दी कमी करणे हा असल्याने शासनाचा उद्देश सफल करण्यासाठी तसेच लॉक डाऊन यशस्वी करण्यासाठी पोलीस विभागवार महत्वाची जबाबदारी असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर स्वतः रस्त्यावर उतरून एक्शन मोड वर राहून कारवाई केली तसेच शहर वाहतूक शाखेला सुद्धा कारवाईचे निर्देश दिले, त्या अनुषंगाने शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ आपल्या वाहतूक सहकारी सह रोडवर उतरून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहन धारकांवर दंडात्मक तसेच वाहन जप्तीची धडक कारवाई केली,

त्या अंतर्गत दिनांक 15।4।21 ते 30।4।21 ह्या लॉक डाऊन च्या पहिल्या चरणात शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई करीत जवळपास 8 हजार वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करून साडे पाच लाख रुपयांचा दंड वसूल केला व काहीही कारण नसतांना रस्त्यावर आढळून येणारी जवळपास 350 वाहने शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये जप्त करून सदर वाहन चालकांवर  संचार बंदी भंग केल्याचे  व इतर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले,

पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ व वाहतूक अंमलदार ह्यांनी केली।