आमदार देवेंद्र भुयार यांच्या निधीतून वरुड येथे उभारणार ऑक्सीजन प्लँट- आमदार फंडातून उपलब्ध करून दिला 58 लक्ष 60 हजार रुपयांचा निधी

0
1342
Google search engine
Google search engine

 

वरुड तालुका प्रतिनिधी:

मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी ऑक्सीजन प्लांट करीता ५८ लक्ष ६० हजार रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे लवकरच वरुड येथे अत्याधुनिक ऑक्सीजन प्लांटची उभारण्यात येणार आहे. या ऑक्सीजन प्लॉट मधून कोविड रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रासह विविध हॉस्पिटलला लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. त्यामुळे वरुड, मोर्शी तालुक्यातील कोरोणा बाधित रुग्णांना वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार आहे. मतदार संघाचे आमदार भुयार यानी तातडीणे ऑक्सीजन प्लॅट करीता निधीची तरतूद केल्यामुळे मतदार संघातील नागरीकांना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाल्याने तसेच अपुऱ्या यंत्रणेमुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून वरुड तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात येणार आहे. यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वतःच्या आमदार फंडातून निधी उपलब्ध करुन दिला असून लवकरच या प्लांट च्या उभारणीस प्रारंभ होणार आहे. कोरोना महामारी च्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये थैमान घातले आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही, बेड मिळाला तर ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. परिणामी रुग्ण दगावत आहेत. या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मतदार संघाचे आमदार भुयार यांनी कंबर कसली आहे.

वरुड येथील ग्रामीण रुग्णालय येथे तातडीने ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरू करण्यासाठी दिनांक २९ एप्रिल रोजी 2020 – 21 च्या स्थानिक विकास आमदार निधी अंतर्गत 58 लक्ष 60 हजार रुपयांची तरतूद करून दिली असून आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचेकडे तातडीणे ऑक्सिजन प्लांट निर्मीतीकरीता प्रस्ताव सादर केला होता. यासाठी लागणाऱ्या निधीचा प्रश्न निर्माण होत असल्याने वरुड येथील ऑक्सिजन प्लांट साठी लागणार संपूर्ण निधी आमदार फंडातून उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता लवकरच ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. ऑक्सिजन प्लांट निर्मितीसाठी ग्रामीण रुग्णालयाची जागा निश्चित करण्यात आली असल्याने वरुड येथे ऑक्सीजन प्लांट उभाल्यात आल्यावर कोविड रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रासह हॉस्पिटलला लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. यासाठी एटीआर इंटरप्राइजेस कंपनीला तात्काळ ऑक्सिजन प्लांट तयार करण्याकरिता कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. याकरीता एकुण 58 लक्ष 60 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता दिनांक ५ मे रोजी देण्यात आली आहे. या ऑक्सिजन प्लांट मधून दररोज 44 सिलेंडर ऑक्सिजन सिलींडरची निर्मिती केली जाणार आहे. त्‍यामुळे कोरोणा बाधित रुग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे कोरोना रुग्णांची व येणाऱ्या कालावधीत उद्भवनाऱ्या प्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना झाली आहे. तातडीणे स्थानिक विकास निधीतून वरुड येथे ऑक्सिजन (प्राणवायू) प्रकल्प उभारणी करिता निधीची तरतूद करण्यात आल्याने आगामी १५ दिवसांत हा प्रकल्प (प्लांट) कार्यान्वित येणार आहे. त्यामुळे मतदार संघातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून मोर्शी विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.