*लसीकरणाबाबत पालिकेचे आवाहन – पहा लस नोंदणी वेळ

0
3226
Google search engine
Google search engine

_जनसंपर्क विभाग, अमरावती महापालिका_

*लसीकरणाबाबत पालिकेचे आवाहन*

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लस घेण्यासाठी शासकीय निर्देशानुसार https://selfregistration.cowin.gov.in या कोविन पोर्टलवर रितसर नोंदणी करणे अनिवार्य आहे. केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचेच लसीकरण केले जात आहे यांची विशेष नोंद घ्यावयाची आहे. ही नोंदणी झाल्यानंतर पोर्टलवर आपल्या सोयीचे लसीकरण केंद्र निवडून त्याठिकाणी दिनांक निवडून आपली अपॉईंटमेंट आरक्षीत करावयाची आहे आणि त्या वेळेला, त्या केंद्रावर जाऊन लस घ्यावयाची आहे. _सदर नोंदणी व अपॉईंमेंट बुकींग प्रक्रिया पूर्ण करूनच लसीकरण केंद्रावर जायचे असून लसीकरणासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करून आलेल्या कोणत्याही व्यक्तींची गैरसोय होणार नाही याची काळजी महानगरपालिकेमार्फत घेतली जात आहे._ आयसोलेशन दवाखाना या केंद्रावर कोविशिल्‍ड ही लस तर मनपा दवाखाना सबनिस प्‍लॉट, शहरी आरोग्‍य केंद्र विलास नगर, मनपा दवाखाना बिछुटेकडी को-व्‍हॅक्सिन ही लस १८ ते ४४ वर्ष या वयोगटातील नागरिकांसाठी पहिला डोस उपलब्ध होणार आहे. *_या केंद्रांवर 10 मे साठी नोंदणी 9 मे ला सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे._*

*पीडीएमसी लसीकरण व्यवस्था*

_डॉ.पंजाबराव देशमुख महाविद्यालय व रुग्णालय या केंद्रावर को-व्‍हॅक्सिन ही लस १८ ते ४४ वर्ष या वयोगटातील नागरिकांसाठी पहिला डोस उपलब्ध होणार असून 9 मे साठी नोंदणी 9 मेस सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे._

*45 वर्षांवरील वयोगटाकरीता तूर्तास लस उपलब्ध नाही.* ती उपलब्ध होताच कळवले जाईल.