अमरावती ब्रेकिंग :- _ब्रेक द चेन_ _संचारबंदीत थोडा बदल_

0
9176
Google search engine
Google search engine

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शुद्धीपत्रक निर्गमित

*दूध विक्री केंद्रे ७ ते ११ दरम्यान खुले ठेवण्यास परवानगी*

बँका अंतर्गत कामांसाठी सुरू

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शुद्धीपत्रक निर्गमित

अमरावती, दि. ९ : जिल्ह्यात १५ मेपर्यंत जारी संचारबंदीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यात थोडा बदल करणारे शुद्धीपत्रक जिल्हा प्रशासनाने निर्गमित केले असून, दूध विक्री केंद्रे सकाळी ७ ते ११ या वेळेत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुग्ध विक्री केंद्रे, दुग्धालये, डेअरी, दूध संकलन केंद्रे, दुकाने यांना दूध संकलन व विक्री करण्यासाठी सकाळी ७ ते सकाळी ११ दरम्यान परवानगी राहील, असे
अपर जिल्हा दंडाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी जारी केलेल्या शुद्धीपत्रकात नमूद आहे.

*बँका केवळ अंतर्गत कामासाठी सुरू; ग्राहकांना ऑनलाईन सेवा*

सर्व प्रकारच्या वित्तीय सेवा उदाहरणार्थ, बँका, पतसंस्था, पोस्ट कार्यालये, तसेच स्टॉक मार्केटशी संबंधित सेवा या केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार व त्यांना विहित करण्यात आलेल्या वेळेनुसार त्यांच्या अंतर्गत कामासाठी सुरू राहतील. ग्राहकांना ऑनलाईन सेवा पुरविण्याचे आदेश आहेत.

०००