करोना निर्बंधांचा भंग करणाऱ्या 40 ऑटो सह 60 वाहनधारकांवर गुन्हे दाखल

0
524
Google search engine
Google search engine

। शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई।।

अकोलाःकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मागील एक महिन्या पासून अकोला जिल्ह्यात लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे, त्याच प्रमाणे संचारबंदी सुद्धा घोषित करून काही निर्बंध लादण्यात आले होते, त्या अंतर्गत ऑटो मध्ये चालकां शिवाय 2 प्रवाश्याना परवानगी देण्यात आली होती,

परंतु शहरातील काही ऑटो चालक दिलेल्या निर्देशाचा भंग करून 2 पेक्षा जास्त प्रवाश्यांची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी आज विशेष मोहीम राबवून करोना निर्देशाचा भंग करून 2 पेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या ऑटो वर धडक कारवाई करून जवळपास 40 ऑटो शहर वाहतूक शाखेत लावून त्यांचेवर गुन्हे दाखल केले तसेच संचारबंदीचा भंग करून विनाकारण फिरणाऱ्या जवळपास 20 मोटारसायकल चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांचे वर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले तसेच 350 वाहन चालकां विरुद्ध दंडात्मक कारवाई करून जवळपास 20,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला

, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व त्यांचे सहकाऱ्यांनी केली।
।। ऑटो चालकांनी 2 पेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक करू नये, अन्यथा ऑटो जप्त करून गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिला आहे।।