अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद अकोला जिल्हा कार्यकारणी विस्तार

0
876
Google search engine
Google search engine

अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद जिल्हा अकोलाच्या नवनिर्वाचित कार्यकारणीची प्रथम सभा राज्याध्यक्ष किशोर तळोकार आणि राज्यसचिव शैलेश काळे यांचा विशेष उपस्थितीत ऑनलाइन पार पडली. सभेचे प्रास्ताविक परिषदेचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. हरिदासजी आखरे यांनी करताना साहित्य परिषदेचे उदिष्ट पदाधिकारी समोर मांडली. या सभेत कार्यकारणीचा विस्तार, परिषदेची भूमिका आणि पुढील नियोजन अश्या विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रा.प्रविण उगले यांनी मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास आणि इतर भाषांचा मराठीवर प्रभाव या विषयावर आपले मत मांडले.
अ.म.शी.सा.परिषदेचे राज्याध्यक्ष किशोर तळोकार ह्यांनी पुढील प्रमाणे संपुर्ण कार्यकारणी घोषित केली. ह्यामध्ये अध्यक्ष प्रा. डॉ. हरीदासजी आखरे, उपाध्यक्ष प्रा. पुरूषोत्तम निर्मळ, प्रा. प्राची मेंढे – बुरघाटे, सचिव डॉ. शिवाजी नागरे, कोषाध्यक्ष डॉ. राजीव बोरकर, महिला प्रमुख प्रा.पुजा जोशी, प्रसिध्दी प्रमुख प्रा. प्रविण उगले, संघटक -१ प्रा.डॉ.दिपाली गावंडे, संघटक- २ हभप ज्ञानेश्वर तायडे, निमंत्रित सदस्य प्रा. ज्ञानेश्वर गटकर, मार्गदर्शक मा.अरूणजी कोरडे से नि ग्रंथपाल शासकीय औ प्र सं अकोला,सल्लागार अरूण वाघ, सदस्य प्रा. वंदना देशमुख अशा प्रकारे सर्वानुमते बिनविरोध कार्यकारणीची निवड झाली. राज्यकार्यकारणीच्या राज्य महिला प्रमुख प्रा.ममता राऊत, राज्यसहसचिव खुशाल गुल्हाणे, राज्यकोषाध्यक्ष महादेव निमकर, राज्यसभासद प्रा.डॉ.ताराचंद कंठाळे, पद्माकर मांडवधरे सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याच प्रमाणे अमरावती अध्यक्ष अतुल पडोळे, व सचिव निलेशकुमार इंगोले, यवतमाळ अध्यक्ष अरविंद झलके उपस्थित होते. त्यांनीही अकोला जिल्हा कार्यकारणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अकोला जिल्हा सचिव प्रा. शिवाजी नागरे यांनी मराठी भाषेचे वास्तविक चित्रण आपल्या विचारातून मांडले. साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष श्री किशोरजी तळोकार यांनी अकोला जिल्हा कार्यकारणीला संस्थेचा उद्देश पटवून सांगितले आणि माय मराठी संवर्धीत होण्यासाठी उपक्रम राबवण्याची व ते जगण्याची गरज आहे. असे सांगितले. तसेच प्रत्येक सदस्याला ह्या उद्दिष्टपूर्तिसाठी विविध जबाबदारी दिल्या. इंग्रजी माध्यमाचा अतिरेकी वापर, मराठी शाळेतुन ओसरत चलालेली पटसंख्या आणि मुख्य म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा परिषदेने आता पर्यंत केलेले प्रयत्न याचा आढावा राज्यसचिव शैलेशजी काळे यानी सभेला मार्गदर्शन करताना दिला. अध्यक्षीय मनोगतात प्राची मेंढे ह्यांनी परिषदेच्या उपक्रमाचे कौतूक करून मराठी भाषा आणि आपली संस्कृतीचा समन्वय सांगुन सभा समाप्तिची घोषणा केली. सभेचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपाली गावंडे, आभार प्रदर्शन अकोला जिल्हा कार्यकारणी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम निर्मळ यानी केले. सभेची शेवट प्रा वंदना देशमुख यांनी पसायदानाने केला.